Water Crisis: माणसांबरोबरच जनावरांचीही पाण्यासाठी वणवण; तोरंगण परिसरात भीषण पाणीटंचाई

जलजीवनअंतर्गत स्वतंत्र योजना झाली तरच सुटणार प्रश्‍न
bottom reached by the well & Citizens carrying water with a drum on a bike
bottom reached by the well & Citizens carrying water with a drum on a bikeesakal
Updated on

Water Crisis : हरसूल व ठाणापाडा परिसरातील अनेक विहिरींनी तळ गाठल्याने पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. माणसांप्रमाणेच मुक्या प्राण्यांनाही घोटभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.

महिला वर्गाला पाण्याच्या शोधार्थ रात्रीचा दिवस करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच परिसरातील तोरंगण व प्रमुख गावांसोबातच अनेक वाड्या-वस्त्यांवरील विहिरी, कूपनलिका, तलाव, वनबंधारे, खासगी बोअर कोरडेठाक पडले आहेत.

गावाच्या जवळचे पाण्याचे सर्वच स्रोत आटल्याने हंडाभर पाण्यासाठी महिलांना कोसो दूर जावे लागत आहे. पुरुष वर्ग बैलगाडी, सायकल, मोटरसायकल, चारचाकी वाहनांतून पाण्याची वाहतूक करून तहान भागवण्याचा प्रयत्न करत आहेत. (Destruction of water for humans animals Severe water shortage in Torangan area nashik news)

पावसाचे माहेरघर असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात दरवर्षी २००० मिलिमिटरपेक्षा जास्त पाऊस होऊनही तालुक्याच्या ग्रामीण भागाला एप्रिल-मे महिन्यातच टंचाईला सामोरे जावे लागते.

तालुक्यात जलयुक्त शिवार योजना, जलजिवन मिशन, वसुंधरा पाणलोट विकास कार्यक्रम, पाणी आडवा-पाणी जिरवा, कृषी विभागाचे पाणी अडविण्यासाठी मजगीकरण, वनतळे, कोन्क्रीट बंधारे याबरोबरच शासनाच्या विविध विभागामार्फत पाण्याच्या उपलब्धतेसाठी अनेक योजना राबविल्या जातात. लाखोंच्या योजना राबवूनही तोरंगण गाव तहानेने व्याकूळच राहिले आहे.

विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वर तालुक्यात अनेक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या मात्र नियोजना अभावी सर्वसामान्य जनतेसोबतच मुक्या प्राण्यांनाहि पाण्यासाठी त्रास सोसावा लागत आहे.

सर्वत्र भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने घोटभर पाण्यासाठी वन्यप्राणी-पक्षी बाजारपेठेत, गावात, वाड्यावस्त्यांवर फिरकायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे माणसांप्रमाणेच पशु-पक्षांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे.

परिसरातील जंगलांमध्ये वनविभाग व अन्य यंत्रणेकडून वन्यप्राण्यांसाठी पाण्याची उपलब्धता करून देण्याची मागणी होत आहे. त्यांना पाण्याची पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी सर्वसामन्य नागरिक करत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

bottom reached by the well & Citizens carrying water with a drum on a bike
Summer Temperature : उष्णतेच्या उच्चांकाने जनजीवन ठप्प! मुंबई- आग्रा महामार्गावरील वाहतूकही मंदावली

योजनेचे काम अपूर्णच

प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून तोरंगणला वायघोळ धरणातून पाणीपुरवठ्याचे काम हाती घेण्यात आले आहे मात्र यावर्षी काम पूर्ण न झाल्याने भीषण टंचाई जाणवत आहे. सध्या ग्रामपंचायतीकडून नदीतील सार्वजनिक विहिरीजवळ मोठा खड्डा खोदून त्यात पाणी सोडले जात आहे.

तेथून ते पाणी विहिरीत झिरपून त्याचा वापर पिण्यासाठी केला जात आहे. काही खासगी बोअरद्वारे देखील गावात पाणी पुरवले जात आहे. सर्वच कूपनलिका व पाण्याचे स्रोत सुरू ठेवले असून त्याद्वारे तहान भागवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

स्वतंत्र योजना असावी

प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत तोरंगण गावाचा समावेश केला असून या योजनेत इतर आठ गावे आहेत, त्यामुळे तोरंगणला पाणी मिळेल कि, पाणीपुरवठा करणारे धरणाच तळ गाठेल हा प्रश्न आहे.

तोरंगण व वाहंदरी या गावांना स्वतंत्र जलजीवन मिशन योजन द्यावी व पाणीटंचाई थांबवावी. सुरू असलेले जलजीवन मिशनचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे.

bottom reached by the well & Citizens carrying water with a drum on a bike
Summer Heat: वाढत्या तापमानाचा दूधाला फटका! उत्पादनात मोठी घट, बचावासाठी काळजी घेण्याचे आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()