Namami Goda Project : नमामि गोदा प्रकल्पाचा D. P. R लांबणीवर

godavari river
godavari riveresakal
Updated on

Namami Goda Project : सिंहस्थाच्या पार्श्‍वभूमीवर गोदावरी व उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठीचा ‘नमामि गोदा’ योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल ऑगस्टअखेर महापालिकेला प्राप्त होणार असून, त्यानंतर राज्य शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार असल्याची माहिती शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिली. (detailed project report of Namami Goda scheme will be received by nmc by end of August nashik news)

दरम्यान, आगामी सिंहस्थ कालावधी लक्षात घेता नमामि गोदा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. वाराणसी येथील गंगा नदी प्रदुषण मुक्त करण्यासाठी तेथे ‘नमामी गंगा’ प्रकल्प राबविण्यात आला. त्याच धर्तीवर नाशिकमध्ये ‘नमामि गोदा’ प्रकल्प राबविला जाणार आहे.

गोदावरी व उपनद्यांच्या काठावरील मलवाहिकांची क्षमतावाढ व सुधारणा करणे, नदीमध्ये मिसळणारे मलजल अडवून मलनिस्सारण केंद्रांकडे वळविणे, मखमलाबाद व कामटवाडे येथे नवीन मलजल प्रक्रिया केंद्राची उभारणी करणे, नव्याने विकसित होत असलेल्या रहिवासी भागात मलवाहिकांचे जाळे निर्माण करणे, नदीघाटाचे सुशोभिकरण व संवर्धन, नुतनीकरण करणे, मलजल प्रक्रिया केंद्रातील प्रक्रियायुक्त पाण्याचा पुनर्वापर करणे आदी महत्वाच्या कामांचा नमामी गोदा प्रकल्पात समावेश आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

godavari river
Thackeray Group: ठाकरे गटाच्या ‘यंग ब्रिगेड’ची BJPच्या गडात चुणूक! युवकांना संधी मिळताच संचारला उत्साह

प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळणार आहे. नमामि गोदा प्रकल्पाची अंमल बजावणी करताना सिवेज ऑॅडीटदेखील केले जाणार आहे. या अंतर्गत पाणीपुरवठा, मलजल, मलनिस्सारण केंद्रांमध्ये प्रक्रिया होणारे मलजलाचा अभ्यास या माध्यमातून केला जाणार आहे.

प्रकल्प अहवाल ऑगस्टअखेर अंतिम करून महापालिकेला सादर केला जाणार आहे. महासभेत मंजुरी मिळाल्यानंतर शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. परंतु, आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७मध्ये होणार असून, तोपर्यंतचा कालावधी लक्षात घेता प्रकल्प वेळेत होईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

या नद्यांचे पुनरूज्जिवन

गोदावरी या प्रमुख नदीसह वाघाडी (वरुणा), नंदिनी, वालदेवी, कपिला या नद्यांच्या पुनरूज्जीवनाचा समावेश नमामी गोदा प्रकल्पात करण्यात आला आहे.

godavari river
Nashik Medical College : सर्व वैद्यकीय महाविद्यालये वर्षभरात ‘NAAC’ च्‍या प्रक्रियेत : प्रति-कुलगुरू निकुंभ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.