Nashik News : जिल्हा परिषद प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही अद्याप ताळमेळ अंतिम होऊ शकलेला नाही.
यावर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी विभाग प्रमुखांची बैठक घेत विभागांनी तत्काळ दायित्व निश्चित करून आगामी वर्षातील निधी नियोजन करावे, असे आदेश श्रीमती मित्तल यांनी दिले. (Determine liabilities plan funds ZP CEO Mittal order to department heads Nashik News)
मार्चच्या अखेरीस या देयकांची रक्कम ऑनलाइन देता न आल्याने त्यांचे धनादेश देण्याचा निर्णय झाला. दरवर्षी मार्चअखेरच्या देयकांचे धनादेश साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्राप्त होतात.
मात्र, यंदा सरकारकडे खडखडाट असल्याने देयकांचे धनादेश जिल्हा परिषदेला प्राप्त झाले नव्हते. सरकारने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्व रोखलेल्या देयकांचे धनादेश वितरित केले.
धनादेश मिळाल्याने आता जिल्हा परिषदेच्या विभागांनी त्यांच्या जमा खर्चाचा ताळमेळ करून तो वित्त विभागाकडून पडताळणी करण्याचे काम सुरू केले. मात्र, कर्मचारी बदल्यांतर्गत बदल्या आदींचा फटका ताळमेळा अंतिम होण्यास बसला.
विभागप्रमुखांकडून दाद मिळत नसल्याने लेखा व वित्त विभागाने स्मरणपत्र देत पुन्हा तंबी देखील दिली होती. मात्र, विभागांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने श्रीमती मित्तल यांनी विभागप्रमुखांना आदेश देत १७ जूनपर्यंत ही माहिती सादर करावी, असे आदेश काढले होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या आदेशानंतर देखील विभागांनी ताळमेळ सादर केलेला नव्हता. त्यानंतर ३० जूनचा अल्टीमेटम दिला गेला. परंतु, ताळमेळ अंतिम होऊ शकला नव्हता. अखेर शुक्रवारी (ता.७) श्रीमती मित्तल यांनी विभागप्रमुखांची बैठक घेतली.
या बैठकीत विभाग प्रमुखांकडून आढावा घेण्यात आला. यात शिक्षण विभागाचा तालुकापातळीवर हिशोब आलेला नसल्याचे कळते. विभागांनी तत्काळ ताळमेळ करून दायित्व अंतिम करावे, असे सूचना श्रीमती मित्तल यांनी केल्या.
९४ टक्के खर्च झाल्याचा अंदाज
हा ताळमेळ मिळत नसल्याने अखर्चिक निधी किती तसेच या आर्थिक वर्षाच्या मंजूर नियतव्ययातून दायित्व वजा जाता उर्वरित निधी किती असणार हे कळण्यास विलंब होत आहे. याचा परिणाम आगामी वर्षातील नियोजनावर होत आहे.
७ जुलै उलटून देखील हिशोब लागत नसल्याने आगामी वर्षातील नियोजन रखडले आहे. ताळमेळ अंतिम टप्यांत असल्याचे विभागाकडून सांगितले जात आहे. यात सरासरी ९४ टक्के खर्च झाला असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.