Nashik News : देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त यात्रोत्सवास प्रारंभ!

Sub-Divisional Officer Babanrao Kakade offering wreaths to the idol on the occasion of Mahapuja on the occasion of the 135th death anniversary of Santshiromani Devmamaledar Shri Yashwantrao Maharaj.
Sub-Divisional Officer Babanrao Kakade offering wreaths to the idol on the occasion of Mahapuja on the occasion of the 135th death anniversary of Santshiromani Devmamaledar Shri Yashwantrao Maharaj.esakal
Updated on

सटाणा (जि. नाशिक) : उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या १३५ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आज सोमवार (ता.१९) रोजी भल्या पहाटे ब्राह्मणवृंदांच्या पवित्र मंत्रोच्चारात व हजारो भाविकांच्या प्रमुख उपस्थितीत महाअभिषेक व महाआरती संपन्न झाली. कोरोनाच्या महासंकटामुळे सलग दोन वर्षांपासून यात्रोत्सव रद्द झाला होता.

मात्र यंदा कोरोनाचे संकट दूर होऊन निर्बंध शिथील झाल्यामुळे पहाटेच्या महाआरतीवेळी अभूतपूर्व उत्साहात हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. यंदा पहिल्यांदाच महापूजेस पहाटे आबालवृद्ध भाविकांची रेकॉर्डब्रेक गर्दी होती. दिवसभर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. (Devamamaledar Shri Yashwantrao Maharaj death anniversary celebration Yatrotsava starts Nashik News)

पहाटे महापूजेप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले भाविक.
पहाटे महापूजेप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले भाविक. esakal

आज पहाटे चार वाजता बागलाणचे उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे, अर्चना काकडे, तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, डॉ.सौ.सुप्रिया इंगळे-पाटील, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र बागड, अरुणा बागड, पालिकेचे मुख्याधिकारी नितीन बागूल, योगिता बागूल, विश्वस्त प्रवीण पाठक व वृंदा पाठक यांच्या हस्ते देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक व महाआरती करण्यात आली.

दरम्यान, महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने गेल्या १२२ वर्षांपासून शहरातील आरम नदीपात्राजवळ अविरतपणे सुरू असलेल्या यात्रोत्सवासही आजपासून सुरुवात झाली आहे. आज पहाटे तीनपासूनच आरमतीरावरील देवमामलेदारांच्या मंदिरात भारुडे, भजने आदी मंगलमय कार्यक्रमांची रेलचेल होती. पहाटेच्या निरव शांततेत ध्वनिक्षेपकावरून वाजविण्यात येणाऱ्या शहनाई, सनई चौघडा व शंखनादामुळे शहरातील वातावरण भल्या पहाटे भक्तीमय झाले होते.

मंदीरासमोर परिसरात काढलेल्या भव्य रांगोळ्या भाविकांचे लक्ष वेधून घेत होत्या. पहाटे बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, डॉ.सौ.सुप्रिया इंगळे-पाटील, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र बागड, अरुणा बागड, मुख्याधिकारी नितीन बागूल, योगिता बागूल, विश्वस्त प्रवीण पाठक व वृंदा पाठक यांच्या हस्ते अभिषेक व महापूजेस सुरुवात झाली. महापूजेसाठी आबालवृद्धांची मोठी गर्दी उसळली होती.

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

Sub-Divisional Officer Babanrao Kakade offering wreaths to the idol on the occasion of Mahapuja on the occasion of the 135th death anniversary of Santshiromani Devmamaledar Shri Yashwantrao Maharaj.
Self Employment Opportunity : पशुपालक, शेतकरी, बेरोजगारांनाही स्वयंरोजगाराची संधी; करा ऑनलाइन अर्ज
येथील तहसील कार्यालयातील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या ऐतिहासिक खुर्चीच्या महापूजेप्रसंगी तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, डॉ.सौ.सुप्रिया इंगळे-पाटील.
येथील तहसील कार्यालयातील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या ऐतिहासिक खुर्चीच्या महापूजेप्रसंगी तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, डॉ.सौ.सुप्रिया इंगळे-पाटील.esakal

महापूजेचे पौरोहित्य वेदमूर्ती मकरंद पाठक, अभय चंद्रात्रे, ऋषिकेश चंद्रात्रे, शेखर मुळे, गजानन जोशी, धनंजय पंडित, संजय चंद्रात्रे, पीयूष गोसावी, चेतन कुलकर्णी, पंकज इनामदार, अमोल मुळे, विनायक कुलकर्णी, रोहित देशपांडे, प्रसाद चंद्रात्रे, गौरांग जोशी, सारंग जोशी यांनी केले. पप्पू गुरव व शरद गुरव यांनी सनई चौघड्याचे वादन केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील मोरे, पोलिस निरीक्षक सुभाष अनमूलवार, विश्वस्त रमेश देवरे, हेमंत सोनवणे, अॅड.विजयबापू पाटील, राजेंद्र भांगडिया, प्रल्हाद पाटील, कौतिक सोनवणे, सुनील खैरणार, लालचंद सोनवणे, स्वप्नील बागड, डॉ.विद्या सोनवणे, महेश देवरे, यशवंत सोनवणे, शिवा सैंदाणे, श्याम बगडाणे, दीपक सोनवणे, निलेश अमृतकर, योगेश अमृतकर, मंडल अधिकारी मनोज भामरे, तलाठी जयप्रकाश सोनवणे, देविदास भावसार, शेखलाल मन्सुरी, बाबूलाल मोरे, नाना देवरे, आदींसह भाविक बहुसंख्येने उपस्थित होते. महाआरतीनंतर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सालाबादाप्रमाणे महात्मा गांधी चौकातील श्री यशवंतराव महाराज मित्र मंडळातर्फे दिवसभरात मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद म्हणून साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आली.

Sub-Divisional Officer Babanrao Kakade offering wreaths to the idol on the occasion of Mahapuja on the occasion of the 135th death anniversary of Santshiromani Devmamaledar Shri Yashwantrao Maharaj.
Cotton News : कापसाचा साठा केल्याने झाला वांधा; जिनींग प्रेसिंग मिल बंद ठेवण्याची वेळ

* देवमामलेदारांच्या ऐतिहासिक खुर्चीची विधिवत पूजा...

येथील बागलाण तहसील कार्यालयात देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांनी ज्या खुर्चीवर बसून जनतेची सेवा केली, त्या ऐतिहासिक खुर्चीची आज पहाटे बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, डॉ.सौ.सुप्रिया इंगळे-पाटील यांच्या हस्ते ब्राह्मणवृंदांच्या पवित्र मंत्रोच्चारात विधिवत पूजा करण्यात आली. महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी याप्रसंगी मंडल अधिकारी मनोज भामरे, तलाठी जयप्रकाश सोनवणे, रोशन गौतम आदींसह महसूल विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

* पोलिस ठाणे आवारातही महापूजा...

सटाणा पोलीस ठाण्याच्या आवारातील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या मंदिरात पहाटे चार वाजता सालाबादाप्रमाणे महापूजा संपन्न झाली. पोलिस निरीक्षक सुभाष अनमूलवार, निर्मला अनमूलवार, किशोर कदम व सौ.कदम यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक, महापूजा व महाआरती करण्यात आली.

महापूजेचे यंदाचे २२ वे वर्ष आहे. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील, वर्षा जाधव, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मच्छिंद्र काळे, पोलिस हवालदार प्रकाश शिंदे, पोलिस नाईक अजय महाजन, पंकज शेवाळे, सविता कावळे, सागर चौधरी आदींसह सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Sub-Divisional Officer Babanrao Kakade offering wreaths to the idol on the occasion of Mahapuja on the occasion of the 135th death anniversary of Santshiromani Devmamaledar Shri Yashwantrao Maharaj.
Gram Panchayat Election 2022 : सिन्नरला 12 ग्रामपंचायतीसाठी 82 टक्के मतदान!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.