Nashik News : रामतीर्थात मोठ्या प्रमाणावर अस्थी पडून - देवांग जानी

A large number of lying bones.
A large number of lying bones.esakal
Updated on

नाशिक/ पंचवटी : रामतीर्थ व त्याच्याशेजारील कुंडात मोठ्या प्रमाणावर अस्थी पडून आहेत. नदीपात्राचे काँक्रिटीकरण होण्यापूर्वी या अस्थींचे नैसर्गिकरित्या विघटन होत होते.

परंतु आता अस्थीविलय कुंड नावालाच उरले असून या अस्थी विघटन होत नसल्याने त्या चक्क कचरा डेपोकडे पाठविल्या जात असल्याचा व त्यामुळे देशभरातून आलेल्या लाखो श्रद्धाळू भाविकांच्या श्रद्धेला धक्का पोचत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी यांनी केला. (Devang Jani statement on Large number of bones lying in Ram Tirtha Nashik News)

नदीपात्रात केलेल्या काँक्रिटीकरणामुळे नदीतील नैसर्गिक स्रोत थांबून अस्थींचे विघटनही थांबल्याने रामतीर्थात अस्थींचे ढीग तयार होत आहेत, असे सांगून हा जनतेच्या श्रद्धेशी खेळ सुरू असल्याचा आरोप श्री. जानी यांनी केला आहे.

या अस्थी कचरा डेपोत पाठवून महापालिका याठिकाणी देशभरातून आलेल्या लाखो श्रद्धांळूंच्या भावनेशी खेळत असल्याचे त्यांनी सांगितले. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रामतीर्थाखालील अनेक कुंडातील काँक्रिटचा थर काढण्यात आला.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

A large number of lying bones.
Dhule News |खेळ बंद करून प्रश्‍न सोडवावा : ललित माळी

त्यामुळे त्या कुंडातील नैसर्गिक जलस्रोत पुन्हा पुनरुज्जीवित झाल्याचा दावा श्री. जानी केला आहे. रामतीर्थासह अस्थीवलय कुंडातील काँक्रिटीकरणाचा थर काढल्यास अस्थींचे आपोआप विघटन होईल, असा दावाही श्री. जानी यांनी केला आहे.

सध्या स्वच्छतेसाठी रामतीर्थातील सर्व पाणी सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे कुंडातील कचरा, नदीकाठावर टाकण्यात आलेली मोठ्या प्रमाणावरील फुटकी मडकी यामुळे रामतीर्थासह गांधी स्मारक परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.

"रामतीर्थातील काँक्रिटीकरणामुळे अस्थींचे विघटन होणे बंद झाले आहे, हा या ठिकाणी देशभरातून येणाऱ्या श्रद्धाळू नागरिकांच्या अवमान आहे. या अस्थी कचरा डेपोत जात असल्याने त्यांच्या श्रद्धेलाच धक्का आहे." - देवांग जानी, सामाजिक कार्यकर्ते.

A large number of lying bones.
NTA Circular : IITसाठी बारावीत विशेष श्रेणी हवी; प्रवेशासाठी किमान टक्‍केवारीची अट पुन्‍हा लागू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.