NMC News : महापालिकेच्या संगणकीय प्रणालीत दोष

Nashik Municipal Corporation
Nashik Municipal Corporationesakal
Updated on

नाशिक : नाशिक रोड व गांधीनगर येथील कर भरणा केंद्रात झालेल्या अपहरणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या (MNC) संगणकीय प्रणालीमध्ये दोष असल्याचे समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर नवीन संगणक प्रणाली विकसित करण्याबरोबरच सद्यःस्थितीत सुरू असताना संगणक प्रणालीचे सेक्युरिटी ऑडिट करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी माहिती व तंत्रज्ञान विभागाला दिल्या. (Developing Conducting security audits of computer systems Notification NMC Commissioner To IT Department nashik news)

विभागनिहाय विभागीय अधिकाऱ्यांकडे संगणक पासवर्ड आहे. घरपट्टी, पाणीपट्टी तसेच विविध कर विभागाकडून कराचा भरणा होत असताना संबंधित कर्मचाऱ्यांकडेदेखील पासवर्ड असतो. मात्र असे असले तरी नाशिक रोड व गांधीनगर येथील कर भरणा केंद्रात जवळपास ५० लाख रुपयांचा अपहार झाल्याची बाब समोर आली.

तसेच, महापालिका मुख्यालयातदेखील भरणा केंद्रातून एका महिला कर्मचाऱ्याकडून पाच लाख रुपयांचा घोळ झाल्याचे स्पष्ट झाले. पंचवटी विभागीय कार्यालयातदेखील अशाच प्रकारचा अपहार झाल्याचे चर्चेत आले होते. यासंदर्भात मुख्य लेखापरीक्षक बी. जी. सोनकांबळे यांना चौकशीचे आदेश दिले होते.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Nashik Municipal Corporation
Winter Temperature : भौगोलिक रचनेमुळे द्राक्षपंढरी नेहमीच गारठलेली! हवेची घनताही जास्त

चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर महापालिकेच्या संगणक प्रणालीमध्येदेखील दोष असल्याचे नमूद करण्यात आले होते. या दोषामुळेच कर्मचाऱ्यांना अपहार करण्याची संधी मिळाल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे सद्यःस्थितीत सुरू असलेल्या संगणक प्रणालीचे सिक्युरिटी ऑडिट करण्याबरोबरच नवीन संगणक प्रणाली विकसित करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी दिल्या.

संगणक विभागाचे सक्षमीकरण

मागील वर्षाच्या अखेरीस महापालिकेची संगणक यंत्रणेवर हॅकरकडून हल्ला करण्यात आला होता. त्या वेळी शनिवार व रविवार असे दोन दिवस संपूर्ण यंत्रणा ठप्प झाले होती. शासकीय सुटी असल्याने फारसा गाजावाजा झाला नाही.

त्यानंतर अपहाराच्या घटना घडल्या. त्यामुळे संपूर्ण संगणकीय व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी तज्ज्ञ अधिकाऱ्याकडे देण्यासाठी आयटी तज्ज्ञांची नेमणूक केली जाणार आहे. सध्या स्थापत्य अधिकारी व विद्युत अभियंत्यामार्फत या विभागाचे कामकाज चालविले जाते.

Nashik Municipal Corporation
Nashik News : श्री कपालेश्‍वर महादेव मंदिर जीर्णोद्धाराचे काम प्रगतिपथावर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.