Metro Neo Project : 3 महिन्यात मेट्रो निओचा नारळ फुटणार; फडणवीस यांचे आश्वासन

Neo Metro project
Neo Metro projectesakal
Updated on

नाशिक : गेल्या तीन वर्षांपासून नाशिककर वाट पाहत असलेल्या मेट्रो निओ (Metro Neo) प्रकल्पाचा नारळ येत्या दोन ते तीन महिन्यात फुटेल असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता.११) दिले. (Devendra Fadnavis assured that Metro Neo project will start in next 2 to 3 months nashik news)

नाशिकसह देशातील अन्य शहरांमध्ये प्रकल्प उभारायचा असल्याने विलंब होत असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिल्याने मेट्रो निओ दृष्टिपथात आली आहे.

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक नाशिकमध्ये आयोजित करण्यात आली होती. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या बाजू मांडताना नाशिकच्या मेट्रो निओचा उल्लेख केला. नाशिकला निओ मेट्रोची घोषणा करण्यात आली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Neo Metro project
Nashik News: मताधिक्य 28 वरून 50 टक्के नेण्याचे उद्दिष्ट : विनोद तावडे

अर्थसंकल्पात देखील आर्थिक तरतूद करण्यात आली. परंतु प्रकल्प सुंदर असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवडला. त्यावरून देशामध्ये दोनच प्रकारच्या मेट्रो असल्या पाहिजे. त्यात टायरबेस मेट्रो हा दुसरा प्रकार आहे. देशात सगळीकडे याच प्रकारे प्रकल्प लागू करण्याच्या सूचना दिल्या.

त्यामुळे मेक इन इंडिया अंतर्गत मेट्रो प्रकल्प तयार केला जाणार आहे. पुढील आठवड्यात दिल्लीत यासंदर्भात सादरीकरण केले जाणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय होईल. संपूर्ण देशात महत्त्वाच्या शहरांमध्ये टायरबेस मेट्रो प्रकल्प होईल. त्यावेळी नाशिक मध्ये मेट्रोचे काम सुरु होईल. दोन ते तीन महिन्यांमध्ये मेट्रोच्या कामाला सुरवात होईल. असे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

Neo Metro project
BJP Election : भाजपचा नाशिकमधून महाविजयाचा मंत्र!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.