Devmamledar Punyatithi : देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज पुण्यतिथी सोहळा

Devmamledar Mandir Goda ghat
Devmamledar Mandir Goda ghatesakal
Updated on

नाशिक : माणसाच्या जीवनात गुरूचे महत्त्व मोठे. ध्येयाधिष्ठित वाटचाल करत यशाचे शिखर गाठणारे आणि समाजाला यशस्वी पारमार्थिक जीवनाची वाटचाल करण्यात मार्गदर्शन करणारे व साक्षात ईश्‍वरस्वरूप मानले गेलेले साधुपुरुष अर्थात देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांचा
१३५ व्या पुण्यतिथी सोहळा मंगळवार (ता.१३) पासून ते बुधवार (ता.२१) पर्यंत गंगाघाटावरील देवमामलेदार मंदिरात होत आहे. महाराजांचा व नाशिकचा जुना ऋणानुबंध राहिला आहे. १३ ते २१ डिसेंबरपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (Devmamledar Shri Yashwantrao Maharaj death anniversary ceremony Nashik News)

रोज सकाळी ७ ते ८ मंगलधून, गणेशपूजन, रुद्राभिषेक, ९ ते ११ पारायण, स्तोत्रपठण, सत्संग, दुपारी २ ते ३ श्री यशवंत लीलामृत, पारायण
दुपारी ३ ते ४ शहरातील विविध महिला भजनी मंडळाची भजने, दुपारी ५ ते ६ प्रवचन, सायंकाळी ७ ते ८. ३० हभप हर्षद जोगळेकर, पुणे यांचे कीर्तन होणार आहे.

विशेष कार्यक्रम

मंगळवारी (ता. १३) डॉ. वर्षा देवकर यांच्या हस्ते समाधी पूजन व अभिषेक, सायंकाळी ५ ते ६ प्रवचन- डॉ. वर्षा देवकर, विषय: श्रीराम भक्त महिमा, बुधवारी (ता.१४) - महिला पुरोहिता विद्या दुगल यांच्या हस्ते पवमान सुक्त पठण, गुरुवारी (ता. १५) सकाळी १० ते १२ (श्री सुक्त पठण- विद्या दुगल), सायंकाळी ५ ते ६ -उदय कुमठेकर दत्त महात्म्यावर प्रवचन, शुक्रवारी (ता.१६) श्री समर्थ रामदास काव्यांजली, सायंकाळी ५ ते ६- प्रवचन व भक्तीसंगीत निरूपण, शनिवारी (ता. १७)- श्रीसुक्त पठण (निशिगंधा मोगल), रविवारी (ता. १८) शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा
सोमवारी (ता. १९) महाराजांच्या समाधीचे पूजन, त्यानंतर पालखी मिरवणूक, रात्री ११ वाजता महाआरती, बुधवारी (ता. २१)- गोपालकाल्याच्या कीर्तनाने सांगता.

हेही वाचा : Credit Score :असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

Devmamledar Mandir Goda ghat
आशादायक! आगीत संसार जळालेल्या आदिवासी कुटुंबाला गुरुकुलचा मदतीचा आधार

समाधीला धक्का नाही

सध्याच्या मंदिराच्या जागी पूर्वी भव्य दगडी मंदिर होते. गंगापूर धरणाच्या निर्मितीनंतर ९ सप्टेंबर १९६९ ला पहिला गोदेला पहिला महापूर आला. या पुरात भव्य दगडी मंदिर पाण्यात वाहून गेले, मात्र मुख्य मंदिर व समाधीला कोणताही धक्का लागला नाही, हे विशेष. त्यानंतर सध्याच्या मंदिराची निर्मिती करण्यात आली. प्रभाकर दशपुत्रे हे देवस्थानचे अध्यक्ष, तर संतोष कुलकर्णी कार्यवाह तर वामन देशपांडे खजिनदार म्हणून काम पाहतात.

गृहस्थाश्रमा सारुनीया अपूर्वा ।
करी ज्ञानमार्गा यथोचित सर्वा ।।
विदेहापरी पूर्ण योगी सुसंता ।
नमस्कार माझा गुरू यशवंता ।
माणसाच्या जीवनात गुरूचे महत्व मोठे

Devmamledar Mandir Goda ghat
ST बसला दे धक्का! दयनीय स्थितीमुळे रस्त्यावरच पडतात बंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.