Shravan 2023 : आज चौथा व शेवटचा श्रावण सोमवार असल्याने त्रंबकेश्वर दर्शनासाठी व ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करण्यास रविवारी रात्री पासुनच भाविकांची शहरात गर्दी झाली होती. भल्या पहाटेच कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी भाविकांची रीघ लागली होती.
तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेस ज्यांना येता आलेनाही अशा भाविकांची आज पुन्हा ह्या प्रदक्षिणा करण्यास गर्दी झाली होती. (Devotees throng for Brahmagiri Pradakshina and darshan of Thrambakeshwar on last Shravan somvar nashik)
त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी सुध्दा पहाटे पासुनच रांगा लागल्या होत्या. पुर्वदरवाजा दर्शनासाठी व देणगी दर्शनासाठी सांयकाळी उशीरा पर्यंत भाविकांच्या रांगा कायम होत्या. गुरुवार व शुक्रवारी अमावास्या असल्याने तो पर्यंत शहरात गर्दी राहील. गणपती उत्सवापासुन गर्दी थोडी कमी होण्याची शक्यता आहे.
आज दुपारी सोमवार निमित्ताने श्री त्रंबकराजाचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा ठेउन पालखी सवाद्य मिरवणुकीने कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी नेण्यात आली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पालखी समवेत विश्वस्त सचिव श्रेया देवाचे, स्वप्नील शेलार, पुरुषोत्तम कडलग ई. उपस्थित होते. पालखी पुजा झाल्यावर परतुन मंदिरात नेण्यात आली.
अधिक व श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी चा उच्चांक होता. आज देखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे व सहकारी यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. पहाटे मात्र मंदिराच्या गर्भगृहात व आवारात मोबाईल नेउन सेल्फी व रील बनविण्यासाठी गर्दी केल्याने थोडा काळ गोंधळ उडाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.