नाशिक : गेल्या काही वर्षात राजकारणाच्या दृष्टीने रामनाम केंद्रस्थानी आल्याने त्याचा परिणाम रामनवमीनिमित्त दिसून आला आहे. देशभरात प्रसिद्ध असलेल्या पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात यंदा भाविकांच्या गर्दीने मागील विक्रम मोडीत काढले.
वाढत्या गर्दीमुळे ‘फुटफॉल' मोजणी यंत्र निकामी झाले. पोलिसांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार दीड लाखांपेक्षा अधिक भाविक श्रीरामचरणी नतमस्तक झाल्याने यंदा प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात मंदिरात गर्दी झाली.
मुक्तिधाम, गोराराम या मंदिरातही भाविकांनी गर्दीचा विक्रम मोडला. (devotees crowd in Kalaram temple broke previous record Footfall counting machine fails Ram Navami 2023 nashik news)
गेल्या काही वर्षात राजकारणात ‘जय श्रीराम’ नारा सातत्याने दिला जात आहे. भाजपसह हिंदुत्ववादी संघटना रामनामासाठी आग्रही आहेत. अधूनमधून राजकारणदेखील रंगल्याचे पाहायला मिळते. केंद्रातील सत्ताधारी भाजपसाठी ‘श्रीराम' हा विषय संवेदनशीलपणे हाताळला जातो.
डिसेंबर २०२३ पर्यंत अयोध्येतील राममंदिर सर्वांसाठी खुले करण्याचे नियोजन आहे. सोशल मीडियावर सातत्याने जय श्रीरामाचा नारा दिला जातो. या सर्वांचा परिणाम म्हणून रामभक्तांची मंदिरांमध्ये गर्दी होत आहे. मागील दोन वर्षे म्हणजे २०२० व २०२१ या दोन वर्षात मंदिरे बंद असल्याने दर्शन घेता आले नाही.
२०२२ मध्ये मंदिरे खुली असली तरी भाविकांचा हवा तेवढा ओढा नव्हता. परंतु, २०२३ मध्ये राममंदिरात झालेली गर्दी मागील वर्षांचे रेकॉर्ड ब्रेक करणारी ठरली आहे. सकाळी साडेपाच वाजता काकड आरतीपासून ते रात्री साडेबारापर्यंत श्री काळाराम मंदिर खुले ठेवण्यात आले होते.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
सकाळपासून झालेली गर्दी रात्री साडेबारापर्यंत कायम होती. मंदिरापासून तीनशे ते चारशे मीटर अंतरापर्यंत सकाळपासून भाविकांच्या रांगा होत्या. मंदिराच्या प्रवेशद्वारावर पोलिसांकडून फुटफॉल यंत्र ठेवण्यात आले आहे.
त्या माध्यमातून किती भाविकांनी मंदिरात प्रवेश केला यासंदर्भात मोजदाद होते. परंतु भाविकांच्या गर्दीमुळे फुटफॉल यंत्र निकामी झाले. मागील वर्षात एक लाख भाविकांनी दर्शन घेतले. या वर्षी दीड लाखांपेक्षा अधिक भाविकांनी मंदिरात दर्शन घेतल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
"कोविडनंतर लोकांमध्ये आस्था वाढली. त्यामुळे या वर्षी गर्दीचे विक्रम मोडीत निघाले. पोलिसांकडून गर्दीचा आकडा दीड लाखांपेक्षा अधिक सांगितला जात आहे."
- मंदार जानोरकर, विश्वस्त, काळाराम संस्थान, पंचवटी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.