Nashik Kalaram Temple : काळाराम मंदिरात भाविकांनी अनुभवला किरणोत्सव; गाभाऱ्यातील मूर्तींना सूर्यस्नान

kirnotsav at the famous Kalaram Temple.
kirnotsav at the famous Kalaram Temple.esakal
Updated on

Nashik Kalaram Temple : प्रसिद्ध काळाराम मंदिरात सध्या सकाळच्या सुमारास किरणोत्सव सुरू आहे. गेली दहा बारा दिवस ढगाळ वातावरणामुळे भाविकांना किरणोत्सव अनुभवता येत नव्हता. बुधवारी (ता. १३) स्वच्छ वातावरण असल्यामुळे सकाळी ठीक सात वाजता सूर्याचे किरण काळाराम मंदिरात पडले.

आणि त्यानंतर सात वाजून दहा मिनिटांनी हे सूर्यकिरण मंदिर गाभाऱ्यातील प्रभू रामचंद्र, सीता माता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तीवर पडले. यामुळे गाभाऱ्यातील मूर्तींना सूर्यस्नान घडले असल्याचे मंदिर पुजारी धनंजय पुजारी यांनी सांगितले. (Devotees experience Kirnotsav at Kalaram Temple nashik news)

प्रसिद्ध काळाराम मंदिरात सध्या गाभाऱ्यातील मूर्तींना सकाळी सूर्यस्नान घडत आहे. कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे. दरवर्षी किरणोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे नाशिक शहरात पंचवटीतील प्रसिद्ध काळाराम मंदिरातदेखील अशाच प्रकारे किरणोत्सव साजरा केला जातो.

काळाराम मंदिराची उभारणी सतराव्या शतकात करण्यात आली असून, पेशवेकाळात मंदिर बांधले आहे. मंदिर उभारताना त्या काळी मंदिरासमोर कोणत्याही प्रकारची बांधकामे नसल्याने सकाळचे सूर्यकिरण थेट प्रभू रामचंद्रांच्या पद कमलांवर पोहचत असल्याचे धनंजय पुजारी यांनी या वेळी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

kirnotsav at the famous Kalaram Temple.
Nashik ISKCON Temple : भगवान श्रीकृष्णाला 1008 पदार्थांचा नैवेद्य; 25 हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

सद्यःस्थितीत मंदिरासमोर उंच इमारती व अनेक बांधकामे झाल्याने मंदिरात सूर्यकिरण पोचण्यासाठी सकाळचे ७ वाजतात.

यानंतर हळूहळू सूर्यकिरण पुढे पुढे सरकत जाऊन सुमारे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये प्रभू रामचंद्र यांच्या पावलांवर व शरीरावरील अन्य भागांवर पोचले जातात. बुधवारी सकाळी सुमारास उपस्थित भाविकांना किरणोत्सव अनुभवता आला.

सूर्यकिरण जसजसे मंदिर गाभाऱ्याकडे पोचत होते, तसतसा रामनामाचा जयघोष वाढत होता. सूर्यस्नान झाल्यावर प्रभू रामचंद्र यांची आरती करण्यात येऊन उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले असल्याचे धनंजय पुजारी यांनी सांगितले.

kirnotsav at the famous Kalaram Temple.
Nashik Kalaram Mandir : प्रभू रामचंद्रास आफ्रिकेतून आणलेली वल्कल प्रदान; भाविकांच्या उपस्थितीत विधिवत सोहळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.