Hanuman Jayanti 2023 : धानोरा व वडगाव बल्हे तसेच, शहरात विविध उपक्रम अन् दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी अशा धार्मिक वातावरणात हनुमान जन्मोत्सव उत्साहात करण्यात आला. (Devotees flock to Dhanora for the darshan of 51 feet Hanuman Jayanti 2023 nashik news)
मनमाड राज्य महामार्गावरील धानोरे शिवारातील शिवशक्ती मारुतीधाम येथील ५१ फुटी हनुमान मूर्तीला सकाळी येथील महंत रामेश्वरगिरी महाराज यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. सकाळी सातला नाना पल्हे, अमोल दारुटे, राधाकृष्ण पल्हे, संतोष काटे, गणेश वैद्य, दीपक भालके यांच्या हस्ते सपत्नीक होमहवन पूजा करण्यात आली.
पौरोहित्य बापू कुलकर्णी यांनी केले. सकाळी अकराला नांदगाव येथील नीलेश महाराज निकम यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला. यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
सावरगाव, नांदूर, सुकी, धानोरे, बाभूळगाव, भाटगाव, धामोडे, येवला, मनमाड, चिचोंडी आदी गावांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. ट्रस्टचे सचिव गोरख पवार, भाऊसाहेब जाधव, उत्तम घुले, नवनाथ जाधव,
अप्पासाहेब आहेर, रामकृष्ण पल्हे, ज्ञानेश्वर पडवळ, ज्ञानेश्वर जाधव, यादवराव चव्हाण, उत्तम साळुंके, सुभाष तिवारी, अरुण मिस्त्रा, कारभारी गायकवाड, शिवाजी घुले, बाजीराव खुळे, ज्ञानेश्वर ठोंबरे, बाळनाथ खुळे, कैलास घुले, चांगदेव पल्हे, तान्हाजी पडवळ आदींनी नियोजन केले.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
वडगाव बल्हे येथे मशाल यात्रा
जागृत पावन मारुती देवस्थान असलेल्या वडगाव बल्हे येथे भाविकांनी पहाटे पासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. हनुमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सलग ३१ व्या वर्षी हरिनाम सप्ताह घेण्यात आला.
गुरुवारी सकाळी सहाला गुणवंत कापसे, गोपाल कापसे यांच्या हस्ते मारुतीच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. पौरोहित्य नितीन कुलकर्णी यांनी केले. अंजनेरी पर्वतावरुन गावातील १०० युवकांनी मशाल ज्योत पदयात्रेने आणली होती. या मशाल ज्योतीची गावातून मिरवणुक काढण्यात आली होती.
पारायण सप्ताहाच्या समारोपानिमित्त गावातून ज्ञानेश्वरीची मिरवणूक काढण्यात आली. यानिमित्त गावातील प्रत्येक घरावर ग्रामस्थांनी गुढ्या उभारल्या होत्या. काल्याचे कीर्तन सरला बेट येथील महंत रामगिरी महाराज यांचे झाले. सलग सात दिवस आरती शिंदे यांचा रामकथेचा कार्यक्रम झाला.
हनुमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बद्रीनाथ जाधव यांनी सुमारे २०० किलो द्राक्षांची आरास हनुमान मूर्तीला केली. तसेच, यावेळी कापसे पैठणी उद्योग समूहाचे संचालक बाळासाहेब कापसे, सप्ताह समितीचे अध्यक्ष नवनाथ घोलप, दिलीप बर्वे, बाबासाहेब आहेर, भाऊसाहेब कापसे, प्रशांत कापसे, भाऊसाहेब जाधव, रवींद्र कापसे, कैलास पवार, अशोक माळी, किरण जाधव आदींनी जन्मोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
राम फळावर साकारले हनुमान, गोरख बोरसेंची कलाकारी
येवला : हनुमान जन्मोत्सवानिमित्त हनुमानाचे चित्र काढण्याची कल्पना मनात आल्यानंतर येथील चित्रकार गोरख बोरसे यांनी राम फळावर हनुमानाच्या विविध प्रतिकृती साकारत हनुमानाचा जन्मोत्सव साजरा केला.
गोरख बोरसे या चित्रकाराने श्रीराम व हनुमान यांच्यातील जवळचे नाते राम फळ असल्याने राम फळावरच बजरंग बलीच्या विविध प्रतिकृती चित्रकलेच्या साहाय्याने साकारून हनुमान जन्मोत्सव साजरा केला.
-वडगाव बल्हे येथील हनुमानास २०० किलो द्राक्षांची आरास
-अंजनेरी पर्वतावरुन पदयात्रेने आणली मशाल ज्योत
-मारुतीच्या मूर्तीला अभिषेक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.