Navratrotsav 2022 : आदिशक्तीचे नवरूपाचे दर्शन नवआभुषणांसह भाविकांना घडणार

saptashrungi Devi
saptashrungi Devi esakal
Updated on

वणी (जि. नाशिक) : आदिशक्ती श्री सप्तशृंगी मातेच्या मुर्तीसंवर्धन कार्या दरम्यान शेंदूर लेपनाचे कवच काढल्यानंतर स्वंयभू श्री सप्तशृंगीची मुळमुर्तीचे मुळरुप समोर आले आहे. श्री सप्तशृंगीचे मुर्तीसवंर्धन पूर्व असलेले शेंदुरलेपनातील असलेले स्वरूप व संवर्धन कार्यानंतर समोर आलेले नवरुपात व स्वरूपात बदल असल्याने आदिशक्तीच्या प्रकटलेल्या नवरुपास साजेसे असलेले नवीन आभुषणांसह भगवतीचे दर्शन घटस्थापनेपासून (ता.२६) भाविकांना घडणार आहे. (Devotees will see saptashrungi devi with new ornaments in Navratrotsav 2022 Nashik Latest Marathi News)

श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर श्री भगवतीच्या मूर्ती संवर्धनाच्या कामानंतर देशभरातील देवीच्या शक्तीपीठांपेकी स्वयंभू आदिशक्तीपीठ म्हणून सप्तशृंगी गडाचा उल्लेख होवू लागला आहे. महिषासुरमर्दिनी अष्टादशभुजा रूप धारण केलेल्या श्री सप्तशृंग निवासिनी आदिमाया- आदिशक्ती भगवतीच्या मूर्ती ही अखंड पाषणातील मंदिर आणि भगवतीच्या मूळ रूपात आहे.

देशभरात पाषणातील मूर्ती मोठ्या आहेत, परंतु पूजेत असणारी देशातील सर्वांत मोठी मूर्ती श्री सप्तशृंग निवासिनी भगवतीची असल्याचा उल्लेख मूर्ती संवर्धनाचे काम सुरू असताना समोर आला आहे. अतिप्राचीन मुळ मूर्तीतील आदिमायेचे तारुण्य स्वरूप हर्षीत, प्रफुल्लित असलेले विलोभनीय रेखीव रुप डोळ्यात साठविणे अवघडच आहे. मूर्ती संवर्धन कार्या दरम्यान मूर्तीवर अठराशे किलो शेंदूर निघाला.

जवळपास दोन फुटाचे शेंदूर लेपनाचे आवरण काढल्यानंतर समोर आलेली श्री भगवतीचे मुळरुपात बदल असला तरी मूर्तीचा आकारात नेमका किती बदल आहे. हे तांत्रिकदृष्ट्या अद्याप समजू शकलेले नाही. मात्र आदिमायेची पूर्वीचा व नवरुपातील मूर्तीचा मुकुट, कंबराजवळील आकार व पावले यात बदल झाला आहे.

saptashrungi Devi
Bank Slip भरण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक; 40 हजार लंपास

त्यामुळे देवीच्या दैनंदिन पंचामृत महापूजा दरम्यान यापूर्वी लावण्यात येणारे सोन्या चांदीचे मुकुट, कंबरपट्टा व आदिमायेचे पाऊले यांचा आकार थोडा मोठा असल्याने, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टने आदिशक्तीच्या नवरुपास साजेसे सोन्या- चांदीचा नवमुकुट, कंबरपट्टा, पावले आदींसह काही अलंकार नव्याने बनविण्यास दिलेले आहे. सोमवारपासून आदिशक्तीचे मुळरुपाचे दर्शन हे नवआभुषणांसह बघावयास मिळणार आहे.

दरम्यान मुर्तीसंवर्धन कामात सुमारे दोन फुटापर्यंत शेंदुराचे आवरण काढल्यामुळे प्रकटलेले नवरुपातील मूर्ती ही गाभाऱ्यात सुमारे अडीच फुटाने मागे आहे. तसेच मुर्तीसमोरील आदिमायीचे दर्शन पाऊलांचा चौथरा हा दोन ते अडीच फुटांनी पुढे सरकवून बांधण्यात आला आहे. त्यामुळे चौथरा व मूर्तीमधील अंतर आठ ते नऊ फुटांचे झाल्याने आदिमायेचे दैनंदिन व उत्सवादरम्यान होणारे धार्मिक विधी करण्यासाठी पुरोहित वर्ग व यजमान भाविक यांना पुरेशी जागा उपलब्ध झाली आहे.

मूर्ती संवर्धन कार्या दरम्यान आदिमायेच्या मूर्तीच्या सभोवती नियोजित चांदीचे नक्षीकाम, चांदीच्या नक्षीदार पत्र्यात कोंटीग असलेली कमानीचे कामाच्या मोजमापात मूर्ती मागे गेल्याने बदल झाला आहे. त्यामुळे मूर्तीसंवर्धन कामा दरम्यान मंदिर गाभारा सुशोभीकरण व चांदीचे नक्षीकामाचे डिझाईनमध्ये बदल झाला असून नवीन मोजमाप घेवुन आगामी चैत्रोत्सव पूर्वीच मंदिर गाभाऱ्यातील सर्व कामे पूर्ण पूर्णत्वास नेण्याबाबत ट्रस्टचे नियोजन असल्याची माहिती न्यासाचे विश्वस्त अॅड. ललित निकम यांनी दिली.

saptashrungi Devi
Nashik : शाकांबरी नदीवरील मुख्य स्मशानभूमीचे रडगाणे थांबेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.