Nashik News: शहरातील धर्मशाळांचे बदलले रूपडे! पथारी ते अत्याधुनिक सुविधा; जुनी धर्मशाळा वातानुकूलित

Dharamshala
Dharamshala esakal
Updated on

Nashik News : धार्मिक तीर्थक्षेत्र ही ओळख असलेल्या नाशिकमध्ये कधीकाळी येणाऱ्या पांथस्थ यात्रेकरूला रात्रभर पथारी टाकण्यासाठी जुन्याजाणत्या दानशूरांनी पदरमोड करत धर्मशाळांची उभारणी केली.

कालौघात पांथस्थ बदलला तशा धर्मशाळाही अत्याधुनिक सुविधांनी युक्त झाल्या. (Dharamshalas in city have changed Pathari to state of art facilities Old Dharamshala Air Conditioned Nashik News)

यंत्रभूमी अशी ओळख मिळविण्यापूर्वी नाशिकची ओळख मंत्रभूमी अशीच होती. कालांतराने प्रथम सहकारी व नंतर शासकीय औद्योगिक वसाहतीची सातपूर व अंबड परिसरात स्थापना झाली अन खऱ्या अर्थाने मंत्रभूमीची जागा यंत्रभूमीने घेतली.

ऐंशीच्या दशकापर्यंत शहरात खानचंद जव्हेरी, खिमजी भगवान, लढ्ढा धर्मशाला, परशराम पुरिया, नरोत्तम भुवन, गजानन भुवन अशा अनेक धर्मशाळा अस्तित्वात होत्या. रात्रभर पथारी टाकण्यासाठी दहा रुपये ते पन्नास रुपये असा दर होता.

गाडगे महाराज धर्मशाळेतही शहरात धार्मिक कामासह वैद्यकीय व अन्य कामासाठी आलेल्यांची नाममात्र दरांत राहण्याची सोय होत होती. अर्थात याला कारण बदललेली जीवनशैलीही आहे.

पूर्वी बैलगाडी किंवा एसटी बसने यात्रेकरू येत. आता प्रत्येकजण स्वतःच्या वाहनातून येऊ लागल्याने सहाजिकच रूमही अत्याधुनिक झाल्या.

शहरातील काही प्रमुख धर्मशाळा

संत गाडगे महाराज यांनी १९५६ च्या सुमारास गोदावरीच्या उजव्या तटावर गाडगे महाराज धर्मशाळेची उभारणी केली, तेव्हा या भागात दिवसाची जायची भीती वाटायची, असे जुनेजाणते सांगतात.

Dharamshala
Nashik News: महापालिका आयुक्तांनी पकडली देयकांची तुकडा गॅंग; पाऊण कोटींच्या देयकांना आयुक्तांची मंजुरी बंधनकारक

याच काळात पंचवटीतील जुन्या मालवीय चौकात लड्डा धर्मशाळा अस्तित्वात होती. या ठिकाणी यात्रेकरूंच्या राहण्यासह छोट्या विवाहांचीही सोय व्हायची. सरदार चौक परिसरातील खिमजी भगवान धर्मशाळेत अवघे चाळीस पन्नास रुपये दिले की रात्रभर राहण्याची सोय व्हायची. आता जुनी धर्मशाळा अत्याधुनिक सुविधा असलेली वातानुकूलित धर्मशाळा उभी आहे.

गाडगे महाराज धर्मशाळा

शहरात विविध कारणांनी येणाऱ्या पांथस्थांना रात्रभर निवारा मिळण्यासाठी संत गाडगे महाराज यांनी १९३० साली गोदाकाठी धर्मशाळेची उभारणी केली. सुरवातीला या ठिकाणी दीडशेहून अधिक रूम होत्या.

परंतु १९८० झालेल्या जोरदार पावसात बऱ्याच खोल्यांची पडझड झाली. तरीही याठिकाणी चार मोठ्या हॉलसह ५३ रूम यात्रेकरूंना भाड्याने दिल्या जातात. या ठिकाणी अवघ्या पस्तीस रूपयांत रूम्स उपलब्ध होतात.

पडझडीनंतर धर्मशाळेची क्षमता कमी झालेली असली तरी आजही एकावेळी दीड हजार यात्रेकरूंच्या मुक्कामाची सोय असल्याचे विश्‍वस्त कुणाल देखमुख यांनी सांगितले.

Dharamshala
Nashik News: पेठ रोडचा वनवास संपता संपेना! संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य, नागरिक त्रस्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.