नाशिक : आज जागतिक महिला दिनानिमित्त (International Womens Day) एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने त्रंबकेश्वर येथील गजानन महाराज भक्तनिवास चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. भर दुपारी बारा वाजता उन्हात हे आंदोलन कर्ते स्री पुरुष बसले होते. (Dharne movement of Elgar labor organization in Trimbakeshwar for various demands nashik news)
मुख्यत्वे मेट्रो किल्ला येथील रस्ता, बरड्याचीवाडी येथे व येल्याची मेट येथे शिक्षक मिळावेत, शबरी घरकुल योजनेचा लाभ देतांना कातकरी कुटुंबाना प्राधान्य देण्यात यावे, टाके देवगाव रस्त्याचे काम सुरु करावे, तेथील गणेशनगर येथे तात्काळ पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अनेक अधिकारी कर्मचारी मुख्यालयात न रहाता खोटे दस्तऐवज देउन बिले काढतात त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, त्रंबकेश्वर तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रात डाॅक्टर व कर्मचारी मुख्यालयी रहात नाहीत.
त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, त्रंबकेश्वर तालुक्यातील सर्व कातकरी वस्तीवर जनजीवन पाणी पुरवठा योजना देण्यात यावी, त्रंबकेश्वर तालुक्यातील कातकरी वस्तीचा सर्ह्वे करून त्या ठिकाणी नागरी सुविधा पुरविण्यात याव्यात अशा विविध मागण्या पुर्तता होण्यासाठी आज हे आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
विशेष म्हणजे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण खातळे, वनविभागाचे वन परिक्षेत्रपाल राजेश पवार, महसुल खात्याचे नायब तहसीलदार व विविध शासकीय खात्यांचे अधिकारी या वेळी मोर्चेकर्यांचे म्हणने ऐकण्यासाठी एका ठिकाणी आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप रणदिवे यांनी भुमिका बजावली व रास्तारोको ऐवजी मोर्चे कर्यांच्या अडचणी समजावुन घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे या वेळी ठरले.
या संघटनेचे प्रमुख भगवान मधे यांनी आदिवासी भागातील विविध समस्या मांडुन त्याचे त्वरेने निराकरण करण्यात यावे अन्यथा जोरदार व वेगळ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येईल याचा ईशारा दिला.
त्रंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी स्री, पुरुष आजच्या आंदोलनात सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक रणदिवे, गटविकास अधिकारी खातळे व वनपरिक्षेत्र अधिकारी पवार यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आंदोलनात सहभागी महिलांचा पुष्प देउन सत्कार केला. व या वेळी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने प्रशस्तीपत्रके देण्यात आली. विद्युत विभागाचे कोणीही उपस्थित न राहिल्याने त्यांचा निषेध या वेळी करण्यात आला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.