नाशिक : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली ढोल बजाव मोहीम आता १ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. (Dhol Bajao campaign for NMC Property Tax Recovery starts again from today nashik News)
महापालिकेला जीएसटीपाठोपाठ घरपट्टीच्या माध्यमातून अधिक कर प्राप्त होतो. मात्र, गेल्या काही वर्षांत थकबाकीदारांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने करवसुलीवर परिणाम होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या विविध कर विभागातर्फे एक लाख रुपयांपेक्षा अधिक घरपट्टी थकीत असलेल्या एक हजार २५८ थकबाकीदारांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली.
मात्र, त्यानंतरही थकबाकीदारांनी थकीत रक्कम भरली नाही. त्यामुळे दिवाळीपूर्वी महापालिकेने थकबाकीदारांच्या दारासमोर ढोल वाजविण्याचा पर्याय निश्चित केला. १७ ऑक्टोबरपासून थकबाकीदारांच्या घरासमोर, तसेच खासगी आस्थापनांसमोर ढोल बजाव मोहीम सुरू करण्यात आली.
पहिल्या टप्प्यात ढोल बजाव महिन्यातून चार कोटी एक लाख १८ हजार रुपये महापालिकेला प्राप्त झाले. ४३५ थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजविण्यात आले. मात्र, दिवाळीनिमित्त मोहीम बंद करण्यात आली होती. आता दिवाळीचा माहोल संपला असून, व्यवहार पूर्ववत झाले आहेत. त्यामुळे २३ ऑक्टोबरला दिलेली मोहिमेवरील स्थगिती उठविण्यात आली असून, १ नोव्हेंबरपासून वसुलीची मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे.
ढोल बजाव मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात ८२३ थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. थकबाकीदारांनी महापालिकेची थकीत वसुली अदा करून कारवाई टाळण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त अर्चना तांबे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.