Dhule-Dadar Express: धुळे- दादर एक्स्प्रेसला 11 ऐवजी 15 डबे! या तारखेपासुन होणार अंमलबजावणी

express
expressesakal
Updated on

Dhule-Dadar Express : धुळे -दादर एक्स्प्रेस या त्रिसाप्ताहिकी धावणाऱ्या गाडीला प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेत या गाडीला अजून चार डबे जोडण्यात येणार असून १८ मेपासून हा बदल अंमलात येणार असल्याने धुळे, चाळीसगाव, नांदगावच्या प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.

यापूर्वी ही ट्रेन अकरा डब्यांसह धावत होती. आता या गाडीला ४ डबे जोडण्यात आल्याने दादर पर्यंत जाण्यासाठी वाटेतील पुढील प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

बसण्यासाठीच्या आसनव्यवस्थेचे आठ तर सर्वसाधारणचे तीन, एक स्लीपर कोच एक एसी कोच व दोन गार्ड ब्रेक व्हॅन अशी रचना या पंधरा डब्यांच्या गाडीची असणार आहे.

दरम्यान, रेल्वेने चार डबे वाढविण्याच्या निर्णयाचे प्रवासी वर्गाने स्वागत करताना या गाडीचा रॅक एकवीस डब्यापर्यंत वाढवत न्यावा व गाडीला दररोज सोडावे व गाडीला इंटरसिटी एक्स्प्रेसचा दर्जा मिळावा, अशी मागणी करण्यात येत आहे. (Dhule Dadar Express 15 coaches instead of 11 Implementation from this date nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

express
Nagli Papad : इगतपुरीच्या अर्थकारणाला नागलीची साथ! महाराष्ट्रासह गुजरातमध्ये पापडाला ग्राहकांची मागणी

धुळे येथून मुंबईकडे जाण्यासाठी थेट सोय नव्हती कोरोना काळापूर्वी अवघी एका बोगीची व्यवस्था चाळीसगावच्या स्थानकावर होती. आता सोमवार, मंगळवार व शनिवारी थेट गाडी धुळ्याहून सकाळी साडेसहाला सोडण्यात येत असते.

त्यामुळे धुळे,‎ चाळीसगाव, नांदगाव भागातील‎ प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी व‎ मुंबईहून परत येण्यासाठी हक्काची‎ रेल्वे गाडी मिळाली आहे.

मात्र ती प्रायोगिक व त्रिसाप्ताहिक स्वरूपाची आहे, असे असूनही या गाडीला रेल्वेला लक्षणीय उत्पन्न धुळे, चाळीसगाव व नांदगाव स्थानकावरून जमा होत असल्याचे दिसून आले आहे.

"धुळे -दादर एक्स्प्रेसच्या डबे वाढविण्याचे निर्णयाचे स्वागत. मात्र ही संख्या एकवीसपर्यंत वाढवावी खानदेशची कनेक्टीव्ही वाढल्याने रेल्वेच्या उत्पन्नात भर पडली आहे. उत्पन्न वाढताना सुविधा देण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन रेल्वेने स्वीकारावा."

- सुमीत सोनवणे, संस्थापक, युवा फाउंडेशन, नांदगाव

express
Nashik News : नगरनियोजनाबाबत शहराची अवस्था ‘फाटकी लंगोट अन्‌ डोईवर जिरेटोप’!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.