Dhule Plastic Ban : प्लॅस्टिक बंदीचे उल्लंघन; व्यापाऱ्यांना 20 हजार दंड

Dhule News : बंदी असलेल्या प्लॅस्टिक माल पिशव्या आढळून आल्याने महापालिकेच्या पथकाने संबंधित तीन व्यापाऱ्यांकडून एकूण २० हजार रुपये दंड वसुल केली.
Municipal team collecting fines from shopkeepers after finding banned plastic goods.
Municipal team collecting fines from shopkeepers after finding banned plastic goods.esakal
Updated on

Dhule News : बंदी असलेल्या प्लॅस्टिक माल पिशव्या आढळून आल्याने महापालिकेच्या पथकाने संबंधित तीन व्यापाऱ्यांकडून एकूण २० हजार रुपये दंड वसुल केली. तसेच, या कारवाईत २०० किलो प्लॅस्टिक मालही जप्त करण्यात आला. धुळे महापालिका आयुक्तांच्या आदेशाने महापालिकेच्या पथकाने धुळे शहरात प्लॅस्टिक बंदीबाबत कारवाई केली. (Dhule Plastic Ban)

शहरातील सुनील ट्रेडर्स, हॅपी गारमेंटस, हरे कृष्णा या तीन दुकानांत बंदी घातलेला प्लॅस्टिक पिशव्या आढळून आल्या. त्यामुळे या दुकानदारांकडून दंड वसुल करुन प्लॅस्टिक माल पथकाने जप्त केला.

यात सुनील ट्रेडर्सला दहा हजार तर हॅपी गारमेंटस व हरे कृष्णा या दुकानाच्या मालकांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड करण्यात आला. (latest marathi news)

Municipal team collecting fines from shopkeepers after finding banned plastic goods.
Dhule News : आयपीएस अब्दुर रहमान यांची याचिका फेटाळली! लोकसभा निवडणूक लढविण्याचे स्वप्न भंगले

मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, प्लॅस्टिक बंदी पथकप्रमुख लक्ष्मण पाटील, स्वच्छता निरीक्षक संदीप मोरे, साईनाथ वाघ, रुपेश पवार, मनीष आघाव, रतन निरगुडे, अख्तर शेख, गौरव माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Municipal team collecting fines from shopkeepers after finding banned plastic goods.
Dhule News : विदेशवारीवेळी पाठीत खंजीर खुपसल्याचे दुःख : आमदार जयकुमार रावल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.