नाशिक : पावसामुळे शहरात झालेली चिकचिक, ऊन- पावसाचा खेळात वातावरण सातत्याने बदलत असल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. मागील आठवड्याच्या अहवालात तीन हजार तापाचे रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयात आढळले, तर पाण्यातील दोषामुळे अतिसाराचे रुग्ण वाढले आहे. स्वाईन फ्ल्यूसह डेंगीचा डंख वाढताना संख्या २५ झाली आहे. (diarrhea dengue sting with swine flu fever in city 3 thousand patients reported nashik Latest Marathi News)
पावसाळ्यात साथीच्या आजारांची संख्या वाढत असली तरी काळजी घेतल्यास आजाराचा प्रादुर्भाव कमी होतो. स्वाईन फ्ल्यूच्या निमित्ताने प्रत्येक नागरिक आरोग्याची काळजी घेत असल्याचे दिसत असले तरी मागील आठवड्यात शहरात तापाच्या रुग्णांची वाढलेली संख्या स्वच्छतेवर प्रश्न निर्माण करणारी ठरत आहे.
शहरात तापाचे तीन हजार ५८ रुग्ण आढळून आले. स्वाईन फ्ल्यूचे चोवीस रुग्ण आढळले. जून महिन्यात या आजाराचे अवघे दोन रुग्ण आढळले होते. त्यामुळे स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. जुलै महिन्यात डेंगीचे २४ रुग्ण आढळले होते. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच तेवीस डेंगीचे रुग्ण आढळले.
अतिसाराने एक हजार ११२ रुग्णांना घेरले. असले तरी खासगी रुग्णालयांचा आकडा घेतल्यास मोठी संख्या बाहेर पडेल. चिकूनगुनियाचे दोन रुग्ण आढळले. बदलत्या वातावरणामुळे तापाचे रुग्ण वाढत असल्याचा दावा महापालिकेचा आहे. सदरची आकडेवारी ही महापालिकेच्या रुग्णालयांमधील आहे. खासगी दवाखान्यांमध्ये विशेष करून झोपडपट्टी भागातील दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या लक्षणीय आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.