नाशिकमध्ये पक्ष एकीकडे तर नगरसेवक दुसरीकडे अशी अवस्था

nashik municipal corporation
nashik municipal corporatione-sakal
Updated on

नाशिक : मायको सर्कल व त्रिमूर्ती चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या निविदेपासून ते सल्लागार नियुक्त करण्यापर्यंत काँग्रेस (Congress) गटनेते व राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) शहराध्यक्षांनी विरोधाची भूमिका मांडली. असे असताना या दोन्ही पक्षाच्या महापालिकेतील नगरसेवकांनी पुलाचे काम करताना सिमेंट ग्रेड वाढविण्याच्या मागणीचे निवेदन आयुक्तांना देऊन समर्थनाची भूमिका घेतल्याने दोन्ही पक्षात एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे महासभेत ३३ कोटींच्या यांत्रिकी झाडूच्या विषयावर एक शब्दही न बोलता मूकसंमती दिली असताना कार्यारंभ आदेश दिलेल्या उड्डाणपुलाच्या कामात ४४ कोटी रुपये वाढविण्याची मागणीचे निवेदन संशय निर्माण करणारे ठरले आहे.

एकमेकाची कोंडी करण्यात पक्ष दंग

त्रिमूर्ती चौक व मायको सर्कल येथे सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्चाचे दोन उड्डाणपूल उभारले जात आहे. उड्डाणपुलाच्या संकल्पनेपासून वादाला सुरवात झाली. कार्यारंभ आदेश दिल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी पुलाचा निधी अन्य विकासकामांकडे वळविण्याची मागणी केल्यानंतर शिवसेनेचे महानगरप्रमुख व नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी पुलाचे समर्थन केले. शाब्दीक वाद वाढत गेल्यानंतर कार्यारंभ आदेश दिल्यानंतर ते मागे घेता येत नसल्याचा तांत्रिक मुद्दा उपस्थित करीत काम रद्द करून दाखवा, असे आव्हान दिले. त्यानंतर पुलाच्या पिलरचे काम सुरू असतानाच संबंधित कंपनीने सिमेंटची प्रतवारी वाढविण्याच्या नावाखाली तब्बल ४४ कोटी रुपये अतिरिक्त देण्याची मागणी केल्याने नवा वाद निर्माण झाला.

त्यानंतर श्री. बडगुजर यांनी उड्डाणपुलासाठी सल्लागार संस्था नियुक्त करताना निविदा प्रक्रिया राबविली गेली नसल्याचा दावा केल्याने तिसरा वाद निर्माण झाला. या वादात भाजपने (BJP) उडी घेत शिवसेनेची (Shivsena) कोंडी करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी पुलाला विरोध न करता निविदा प्रक्रिया, नियुक्त केलेल्या सल्लागार संस्थेवर संशय व्यक्त करीत विरोध दर्शविला. त्यापूर्वी काँग्रेस गटनेते शाहू खैरे यांनी पुलाची गरजच नसल्याचे मत व्यक्त करत विरोध केला होता.

nashik municipal corporation
महंत नरेंद्रगिरींच्या आत्महत्येच्या चौकशीची साधुसंतांची मागणी

काँग्रेस, राष्ट्रवादीत बेबनाव

दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पक्ष म्हणून भूमिका स्पष्ट केली असताना आज राष्ट्रवादीचे नगरसेवक जगदीश पवार यांनी आयुक्तांना निवेदन देत पुलाचे काम दीर्घकाळ टिकण्यासाठी सिमेंटची प्रत चाळीसवरून ६० करावी, असे मत व्यक्त केले. पवार यांच्या पत्रावर जो मजकूर आहे, तो जशाच्या तशा उतरवून काँग्रेसचे राहुल दिवे यांनीदेखील हीच मागणी केली आहे. काँग्रेसच्याच आशा तडवी यांनी पूल शंभर वर्षे टिकण्यासाठी एम ६० ग्रेड सिमेंटचा वापर करण्याची मागणी केली आहे. तिघांच्या पत्रात स्पष्ट उल्लेख नसला तरी सिमेंटची प्रत वाढविणे म्हणजे पुलाची अधिकची किंमत ठेकेदारांना अदा करणे असा स्पष्ट होत असल्याने पुलाच्या समर्थनार्थ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस उतरल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. कुठल्याही पुलाचे वयोमान चाळीस वर्षांपेक्षा अधिक नसावे, हा शासकीय नियम आहे. परंतु, काँग्रेसच्या तडवी यांनी शंभर वर्ष पूल टिकण्याची मागणी करीत पुलाचे केलेले केविलवाणे समर्थन ठरत आहे.

nashik municipal corporation
तुमच्या वाहनांवर हजारो रुपयांचा दंड तर नाही ना...?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.