बिजोरसे : सरकारच्या विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी लाभार्थी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. परंतु महाडीबीटी पोर्टलवर अर्ज दाखल होत नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. काही महिन्यांपासून तांत्रिक कारणांमुळे अडचणी उदभवत आहेत.
अडचणींमुळे काही विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ देण्यासाठी सरकारने महाडीबीटी पोर्टल सुरू केले आहे. (Difficulties for students in filing applications on MahaDBT portal Fear of being deprived of scholarship Nashik)
पोर्टल दिवसा कधी बंद, तर कधी रात्री सुरू होते. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी नाखूष आहेत. विद्यार्थ्यांना सायबर कॅफेचा आधार घ्यावा लागतो. पण एका वेळेत अर्ज भरून होत नसल्याने, वारंवार चकरा मारण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येत आहे.
शिवाय वारंवार प्रयत्न करून अर्ज भरताना पैसे मोजावे लागत असल्याने विद्यार्थ्यांना अधिकचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. सायबर कॅफेच्या चालकांनी दिलेल्या माहितीनुसार १५ ते २० दिवसांपासून पोर्टलवर विविध प्रकारच्या तांत्रिक अडचणी उदभवत आहेत.
कागदपत्रे ‘अपलोड' होण्यापर्यंत प्रक्रिया होऊन अंतिम टप्प्यात पोर्टल ठप्प पडते. अर्ज दाखल करण्याची मुदत असली, तरी वारंवार तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत. अर्ज ‘अपलोड' करण्यातील अडचणी दूर करण्यासाठी कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे आहे.
शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरला जातो. कागदपत्रे ‘अपलोड' होईपर्यंत पोर्टल ठप्प होते. त्याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. विद्यार्थी आणि आमचा वेळ वाया जाणार नाही, असे जय भारत कॅफेचे संचालक अभिषेक काकडे यांनी सांगितले.
बारावी विज्ञानाचा विद्यार्थी तुषार मोरे म्हणाला, की गेल्यावर्षीची शिष्यवृत्ती अद्याप मिळाली नाही. त्यामुळे अर्ज भरावा की नाही, अशी चिंता आहे. अर्ज भरण्यासाठी गेल्यावर कॅफेवाले पोर्टल बंद आहे, असे सांगतात. त्यामुळे कितीवेळा चकरा मारायच्या हा खरा प्रश्न आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.