Nashik News : केंद्र व राज्य शासनाच्या गृहनिर्माण मंत्रालयाकडून बांधकामांना प्रोत्साहन देण्याबरोबरच Construction खर्च कमी करून किमती- कमी करण्यासाठी विविध योजना घोषित केल्या जात असताना दुसरीकडे राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रम (एन-कॅप) अंतर्गत प्रदूषण नियंत्रण मंडळाने बांधकामांवर मर्यादा येईल असे मार्गदर्शक तत्त्वे घोषित केली आहे. बंधनकारक मार्गदर्शक तत्त्वातून घरांच्या किमती कमी होण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता अधिक आहे.
दिवसागणिक वायुप्रदूषणात वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘नॅशनल एअर क्लीन प्रोग्रॅम’अंतर्गत राज्य शासनाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहे. (Difficulty in construction sector due to environment department guidelines nashik news)
त्यात महापालिका हद्दीत एक एकरपेक्षा व ५० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींचे बांधकाम चालू असेल तेथे प्रकल्पाच्या परिघाभोवती २५ फूट उंचीचे पत्रे लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोर बांधकामाच्या खर्चात वाढ होईल, असे नियम घालून देण्यात आले.
त्यावर कारवाईदेखील निश्चित केली आहे. त्यामुळे खर्च वाढण्याबरोबरचं नियम पाळू की काम करू, अशी स्थिती बांधकाम व्यावसायिकांची होणार आहे. त्याचबरोबर वायुप्रदूषण कमी करण्याच्या अंमलबजावणीसाठी महापालिका आयुक्त तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाला विशेष पथके तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले असून, पथकासाठी विभागीय पातळीवरच्या अधिकाऱ्यांना अधिकार दिले जाणार आहे.
कार्यस्थळावर मार्गदर्शक सूचनांचे पालन होत नसल्यास काम थांबविणे, नोटीस बजावणे, बांधकामाचे स्थळ सील करणे यासारखी कारवाई केली जाणार आहे. राज्याचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी यासंदर्भात पत्रक काढले आहे.
अशा आहेत मार्गदर्शक सूचना
- बांधकाम सुरू असलेल्या इमारतींना हिरव्या कापडाने बंदीस्त करणे.
- पाडलेल्या बांधकामांना ताडपत्री, ओल्या हिरव्या कापडाने बंदिस्त करणे.
- संरचना पाडताना सातत्याने पाणी फवारणी.
- बांधकामाच्या ठिकाणी अॅन्टी-स्मॉग गनचा वापर.
- बांधकाम साहित्य वाहून नेणारी सर्व वाहने पूर्णपणे झाकावी.
- बांधकामे साईट्सवर वायू प्रदूषण मॉनिटर्स लावावे.
- ग्राइंडिंग, कटिंग, ड्रिलिंग, सॉइंग, ट्रिमिंगची कामे बंदिस्त भागात.
- बांधकाम साहित्य विल्हेवाट प्रकल्प बंधनकारक.
- कामगारांना संरक्षणात्मक उपकरणे घालणे बंधनकारक. (मुखवटे, गॉगल, हेल्मेट)
- पूल, उड्डाणपुलासाठी किमान २० फुटांचे बॅरिकेडिंग.
- बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनांना ट्रॅकिंग.
- बांधकाम साहित्य रस्त्यावर सांडणाऱ्या वाहनांवर कारवाई.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.