MPSC Combined Prelims Exam : एमपीएससी संयुक्‍त पूर्व परीक्षेच्या पेपराची काठीण्य पातळी सौम्‍य

MPSC Exam
MPSC Examesakal
Updated on

MPSC Combined Prelims Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र अराजपत्रित गट ‘ब’ व गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवारी (ता.३०) नाशिक जिल्‍ह्‍यातील ३० केंद्रांवर पार पाडली. पेपर सोपा गेल्‍याची प्रतिक्रिया अनेक उमेदवारांनी दिली, त्‍यामुळे मुख्य परीक्षेसाठी निवडीत चुरस बघायला मिळणार आहे.

दरम्‍यान नाशिकमध्ये प्रविष्ठ झालेल्‍या २६ हजार ८२७ पैकी २१ हजार ९२२ उमेदवारांनी परीक्षा दिली तर ४ हजार ९०५ परीक्षार्थी गैरहजर होते. सकाळी अकरा ते बारा या कालावधीत ही परीक्षा घेण्यात आली.

जिल्‍हा प्रशासनाकडून परीक्षेसाठी आवश्‍यक नियोजन आखण्यात आलेले होते. शंभर गुणांसाठीच्‍या या परीक्षेसाठी एक तासाचा वेळ दिलेला होता. (Difficulty Level of MPSC Combined Prelims Exam Paper Moderate nashik news)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

MPSC Exam
Labor Day: बाधितांचे कुटुंबीय आजही मदतीपासून वंचित; शिरपूरजवळील रूमित केमिकल्समधील स्फोटाला 4 वर्ष पूर्ण

पेपरची काठीण्य पातळी सौम्‍य असल्‍याने बहुतांश परीक्षार्थींनी वेळत सर्व प्रश्‍न सोडवितांना चांगली कामगिरी नोंदविली. शहरातील काही केंद्रांवर हजेरी नोंदवितांना काही तांत्रिक अडचणी उद्‌भवल्‍याचे परीक्षार्थींनी सांगितले.

बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी नोंदवायची असल्‍याने, काही उमेदवारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. प्रश्‍नपत्रिका सोडविण्यात विलंब होऊ नये म्‍हणून अशा उमेदवारांची हजेरी प्रक्रिया परीक्षा पार पडल्‍यानंतर पूर्ण करण्यात आली.

दरम्‍यान गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आयोगातर्फे सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटिव्‍हीची व्‍यवस्‍था केलेली होती.

MPSC Exam
Market Committee Election Analysis : अभिजित पाटलांचे बेरजेचे राजकारण यशस्वी! प्रस्थापितांना धक्का

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()