Digital युगात लोककलांना ऊर्जितावस्था! तरुण पिढी सक्रिय झाल्याने Social Mediaवर सर्वाधिक चर्चा!

Folk Art
Folk Artesakal
Updated on

नाशिक : ‘तमसो मा ज्योतिर्गमय...’ या विचारांतून पेटवल्या जाणाऱ्या ‘शेकोटी’ माणसाला ऊर्जा देतात. अशीच ऊर्जा ‘लोककला’ही देतात. लोककलेतून प्राप्त ऊर्जा ही एकूणच जगण्याचं बळ देणारी असते. अगदी अर्वाचिन काळापासून मानवाला उपलब्ध असलेल्या या दोन्ही प्रकारच्या ऊर्जांचा आजच्या डिजिटल युगातही अजिबातच ऱ्हास झालेला नाही.

त्यामुळे ‘लोककलां’चे संवर्धन करण्यासाठी अन्‌ ऊर्जितावस्था देण्यासाठी ‘डिजिटल माध्यमां’चा खूपच प्रभावी वापर आज सर्वत्र केला जातोय. (digital era folk art energized most discussion on Social Media young generation active nashik news)

गोव्यासारख्या राज्यात पंधरा वर्षांपासून सुरू असलेल्या ‘शेकोटी संमेलना’च्या धर्तीवर नाशिकमध्येही पहिलेवहिले ‘शेकोटी लोककला साहित्य संमेलन’ झाले. मुळत: ते लोककलांचेच संमेलन होते.

‘साहित्य’ शब्द यात केवळ नाशिकमधील कवींच्या सक्रियतेचा प्रभाव म्हणून आलेला आहे. कोरोनानंतरच्या प्रवासात सर्वच क्षेत्रांत डिजिटल माध्यमांचा प्रचंड वापर आणि उपयोग होत आहे. दुर्गम भागातही डिजिटल माध्यमे पोचली आहेत. या माध्यमांचे केवळ आकर्षण नव्हे, तर सर्वाधिक वापरही होताना दिसत आहे.

त्याचाच थेट परिणाम ‘लोककलां’च्या संवर्धन आणि वृद्धीवर झालेला असल्याचे नाशिकमधील संमेलनातून बघावयास मिळाले. पारंपरिकतेकडून ‘डिजिटल’कडील हा प्रवास मानवी जीवनाला याच ‘लोककलां’ची ऊर्जा पुरविणारा आहे.

Folk Art
Nashik News : अनैसर्गिक आहारामुळे पशुपक्ष्यांची जीवनशैली धोक्यात; जनजागृती करण्याची गरज

आकर्षणातून प्रभावी वापर

सोशल मीडियचा पुरेपूर लाभ लोककलावंतांनी घेतला. लोककला सातासमुद्रापार पोचल्या. त्यांचे संवर्धनच नव्हे, तर त्यांना ऊर्जितावस्थाही प्राप्त झाली. परिणामी, आज समाज माध्यमांमध्ये सर्वाधिक चर्चा याच लोककलांची आहे.

एखाद्या शहरात ‘कवीं’चा प्रभाव असतानाही प्रथमच होत असलेल्या संमेलनात तब्बल ३६५ कवींच्या बरोबरीने एखादा राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदिवासी कलावंत मानाचे स्थान पटकावतो, लोककलांचे नानाविध प्रकार अवघ्या २४ तासांत अनुभवावयास मिळतात, त्यांचा प्रत्यक्ष आनंद घेता येतो हे सारे याच आशावादाचे प्रतीक आहे.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Folk Art
Nashik News : मेथीचे लाडू बनवताना गृहिणींचे बजेट कोलमडणार! ड्रायफ्रूटचे दर दीडपट ते दुप्पट वाढले

लोककला...

समाजाच्या विविध गटांतून तयार झालेली गीते, नृत्याचे प्रकार, कविता, संकल्पना यांचा समावेश लोककलांमध्ये होतो. कीर्तन, भजन, दशावतार, जत्रा-उत्सवामधून होणारे वग्‌नाट्य, तमाशा, लोकनाट्य, विधीनाट्य, बहुरूपी, डोंबाऱ्याचे खेळ, पोवाडा, गोंधळ, जागरण, कलगीतुरा, लळीत, बहुरूपे, कुडमुडे जोशी, वासुदेव, दशावतार, लावणी, लेझीम, भारुड, मानवी वाघ, दिवाळीची गाणी, लोकगीतं यासारखे सर्वच कलाविष्कार म्हणजेच लोककला होय.

वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे। पक्षीही सुस्वरे आळविती।।१॥
येणे सुखे रुचे एकांताचा वास। नाही गुणदोष अंगी येत।।२॥
आकाश मंडप मृथिवी आसन। रमे तेथें मन क्रीडा करू॥३॥
कथा कमंडलू देह उपचारा। जाणिवतों वारा अवसरू॥४॥


या अभंगाच्या पहिल्याच ओळीत पर्यावरण रक्षणाचे घोष आहे. मानवाला एकांताची व काही काळ तरी निसर्गाच्या सानिध्यात शांत घालवण्याची गरज दर्शवते.

विस्तरीत मंडपाप्रमाणे असलेले आकाश व बसण्याचे आसन असणारी पृथ्वी किती महत्त्वाचे आहे, हे अगदी सरळ सोप्या शब्दांमध्ये तुकोबांनी मांडले आहे. आपल्या समस्त लोककलांचा आधार बनलेले असे कितीतरी अभंग संत तुकाराम महाराजांनी लिहून ठेवले आहेत.

Folk Art
Kite Festival : मला येड लावलंय, लावलंय... पतंगोत्सवाने म्हणत येवलेकर पतंगोत्सवात दंग!

"साहित्य आणि संस्कृती यांचे सर्वश्रेष्ठ प्रायोजन म्हणजे आनंद आणि प्रबोधन होय. शेकोटी लोककला साहित्य संमेलनात याचीच तर प्रचीती आली. अत्यंत दुर्मिळ अशा लोककलांनी खरोखरच आनंद देण्याचे आणि प्रबोधनाचेच काम केले. या लोककलांचे संहिताकरण, चित्रिकरण करणे खूपच गरजेचे आहे. हे कामदेखील आजच्या डिजिटल युगात मोठ्या प्रमाणावर होत आहे." -प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, लोककलांचे अभ्यासक व ज्येष्ठ साहित्यिक

"लोककलेला चेहरामोहरा नसला, तरी माणसं जोडण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम लोककलावंत नेहमीच करत असतात. ‘डिजिटल माध्यमं’ उपलब्ध असल्याने संवर्धन आणि ऊर्जितावस्थेच्या अंगाने भरपूर काम करण्यास वाव निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे हे काम तेवढ्याच जोमाने होत आहे, याचा आनंद वाटतो." -डॉ. गणेश चंदनशिवे, लोककलांचे अभ्यासक व संशोधक

Folk Art
Kamgar Kalyan Natya Spardha : कुंभमेळ्यातील कहाणी ‘साधू संत येती घरा’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.