Nashik News: लासलगाव बाजार समितीत डिजिटल भुईकाटा; शेतकऱ्यांच्या वाहनाचे विनाशुल्क वजनमाप

Nashik News
Nashik Newsesakal
Updated on

लासलगाव : येथील बाजार समितीच्या लासलगाव मुख्य बाजार आवारावर बसविलेल्या ८० मे. टन क्षमतेच्या नविन डिजिटल भुईकाट्याचा शुभारंभ बाजार समितीच्या प्रशासक सविता शेळके आणि विक्री व सेवाकर उपायुक्त प्रशांत शेळके यांच्या हस्ते करण्यात आला.

या वजनकाट्यावर शेतकऱ्यांच्या वाहनांचे विनाशुल्क वजनमाप करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना बाजार समितीतर्फे ही नववर्षाची भेटच मानली जात आहे.

Nashik News
Nashik News : शहरात 342 टॉवर करांच्या कक्षेबाहेर

बाजार समितीने तीस वर्षांपूर्वी बसविलेल्या इलेक्ट्रॉनिक-नि-मॅकेनिकल भुईकाट्याचे गर्डर गंजून त्यांना अनेक ठिकाणी छिद्रे पडलेली होती. सदर काट्याचे नाईफ एजेस व बेअरिंगसुद्धा खराब झालेल्या होत्या.

बाजार समितीचा भुईकाटा बंद असल्यामुळे शेतकरी बांधवांची गैरसोय होत होती. बाजार समितीने हा भुईकाटा तत्काळ सुरू करावा अशी मागणी शिवसेनेचे निफाड पूर्वतालुका प्रमुख प्रकाश पाटील व इतर तसेच लासलगाव शहर विकास सेवा समितीने बाजार समितीसह मुख्यमंत्री, पालकमंत्री व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थेकडे केली होती.

हेही वाचा: एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत जिल्हा उपनिबंधक डॉ. सतीश खरे यांनी शेतकरी बांधवांची गैरसोय दूर व्हावी यासाठी तातडीची उपाययोजना करण्याबाबत आदेश दिले होते.

Nashik News
Nashik News : 3 उमद्या तरूणांच्या जाण्याने हळहळली चास पंचक्रोशी; रात्री उशिरा अंत्यसंस्कार

पणन संचालनालयाने बाजार समितीस विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून नविन डिजिटल इलेक्ट्रॉनिक भुईकाटा बसविण्यास परवानगी दिल्याने बाजार समितीने जुना भुईकाटा काढून त्याऐवजी ८० मे. टन क्षमतेचा डिजिटल भुईकाटा बसविला आहे. हा भुईकाटा आज गुढीपाडव्याचे औचित्य साधून वजनमापासाठी कार्यान्वित करण्यात आला आहे.

प्रशासक सविता शेळके आणि विक्री व सेवाकर उपायुक्त प्रशांत शेळके यांच्या हस्ते भुईकाट्याचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे, कांदा उत्पादक शेतकरी साहेबराव शेळके व जावेद मणियार यांच्याहस्ते वजनमापासाठी आलेल्या पहिल्या ट्रॅक्टरचे पूजन करण्यात आले.

Nashik News
Nashik Crime News : सावरकरनगरमध्ये सराफी पेढीवर डल्ला; दुर्लक्षामुळे 25 लाखांचे दागिने चोरीला

बाजार समितीचे माजी सदस्य रमेश पालवे, वास्तुविशारद नितीन चव्हाण, वेमन सर्व्हिसेसचे आर. बी. नायर, प्रकाश पाटील, बाळासाहेब होळकर, धान्य व्यापारी सागर थोरात, शरद होळकर, श्रीनिवास मुंदडा, विठ्ठल कुटे, संजय वाघचौरे, बाजार समितीचे सहसचिव प्रकाश कुमावत, सहाय्यक सचिव अशोक गायकवाड, लेखापाल सुशिल वाढवणे, लिलाव प्रमुख सुनील डचके, संदीप होळकर, सौ. मीनाक्षी गायकवाड, हिरालाल सोनारे, संजय होळकर, स्वप्नील पवार, राहुल शेजवळ, संतोष गायकर, सागर कुऱ्हाडे, राहुल बर्डे, सचिन बैरागी, संदीप शेलार, हर्षवर्धन होनराव, गंगाधर जगताप, लाला ठाकरे, कीर्ती पाटील, नंदकुमार भंडारी यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.