नाशिक : चित्रपट प्रेमींच्या हृदयात स्थान असलेले अभिनेते, ट्रॅजेडी किंग युसूफ भाई अर्थात दिलीप कुमार. ट्रॅजेडी किंग व ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी आज सकाळी मुंबईत हिंदूजा रुग्णालयात निधन झाले. दिलीप कुमार अर्थात युसूफ भाई यांचे कुटुंब मुळचे देवळाली लष्करी कॅन्टोनमेंट येथील रहिवासी आहे. दिलीप कुमार यांची एक इच्छा होती मात्र आता 'ती' अपूर्ण राहणार आहे. (Dilip-Kumars-wish-remain-unfulfilled-Nashik-marathi-news)
'ती' इच्छा राहिली अपूर्ण!
देवळाली येथील मिलिटरी डेअरी फार्म समोर सुन्नी कब्रस्तान येथे त्यांची आई, वडिलांना दफन करण्यात आले. ''त्यांच्या मध्ये मला दफन करावे'' ही दिलीप कुमार यांची इच्छा होती. त्यासाठी आई आणि वडिलांच्या कबरींमध्ये जागा राखीव ठेवण्यात आली आहे, मात्र आता 'ती' इच्छा अपूर्ण राहणार आहे. देवळाली कँपला अंत्यसंस्कार करण्यास सायरा बानूंनी नकार दिला आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळेच अंत्यसंस्कार मुंबईतील जुहू येथे होणार असल्याची माहिती जवळच्या नातेवाईकांनी दिली. आपल्या आई- वडिलांच्या आठवणींनी ते हळवे होत असत. त्यांच्या कबरीजवळच आपलाही दफन विधी करावा. त्यांच्या सानिध्यात मला स्वर्गप्राप्ती (जन्नत) मिळेल अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे आई- वडिलांच्या कबरींच्या मध्ये त्यांच्यासाठी जागा राखील ठेवण्यात आली होती.
बालपणी करायचे फळे विक्री
ट्रॅजेडी किंग व ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी आज सकाळी मुंबईत हिंदूजा रुग्णालयात निधन झाले. हे दिलीप कुमार अर्थात युसूफ भाई यांचे कुटुंब मुळचे देवळाली लष्करी कॅन्टोनमेंट येथील रहिवासी आहे. त्यांच्या आई आयेशा बेगम आणि वडील लाला गुलाम सरवर खान यांचे ते सुपुत्र होते. त्यांचा जन्म १९२२ मध्ये पेशावर येथे झाला. १९३६ च्या सुमारास ते देवळालीला स्थलांतरीत झाले. १९४४ मध्ये दिलीप कुमार यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यांच्या अनेक चित्रपटांचे चित्रीकरण देवळाली परिसरात झालेले आहे. त्यात `गंगा जमुना` हा प्रमुख चित्रपट आहे.
दिलीप कुमार यांचे कुटुंब फाळणीपूर्वीच भारतात आले व देवळालीला स्थायीक झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीशांनी सामरीक सोयीसाठी अफगानीस्तान-पाकीस्तानच्या सीमेवरील क्वेट्टा येथील आपले तोफखाना केंद्र (सध्याचे स्कुल ऑफ आर्टीलरी-School of Artillery) देवळालीला हलवले. आल्हाददायक थंड हवेचे ठिकाण, जंगल व डोंगर यामुळे तोफखान्याचे प्रशिक्षण व सरावासाठी हे गाव त्यांना सोयीचे वाटले. तोफखाना केंद्रामुळे लष्कराचे कॅन्टोनमेंट (छावणी) आली. त्यात लष्कराशी संबंधीत अनेक व्यवसायिक आले. त्यात हे खान कुटुंब होते. बालपणी दिलीपकुमार कुंटुबाच्या लष्करी अधिकाऱ्यांना फळे विक्रीच्या व्यवसायात मदत करीत असत.
नाशिकचे हवामान आवडीचे!
अभिनयाची गोडी लागल्यावर ते मुंबईला गेले. तेव्हा त्यांचे आई, वडिल व भाऊ देवळालीतच राहिले. सध्या त्यांच्या कुटुंबातील पुतणे येथील आनंद रोडला राहतात. मुस्लीम समाजाचे कब्रस्तान येथे लष्कराच्या डेअरी फार्मलगत आहे. या सुन्नी कब्रस्तानमध्ये खान कुटुंबियांच्या दिवंगत सदस्यांचा दफनविधी करण्याची परंपरा आहे. नाशिकचे हवामान आवडल्याने त्यांनी शहरालगत गंगापूर गावाजवळ शेतीही घेतली होती. पूर्वी दिलीप कुमार नियमितपणे नाशिकला येत असत. आपल्या शेतीत रमत असत. कुटुंबियांना भेटत. आई वडिलांच्या कबरीचे दर्शन घेत असत.
(Dilip-Kumars-wish-remain-unfulfilled-Nashik-marathi-news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.