Nashik News : शिक्षणाअभावी आदिवासी समाजात पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण शहराच्या तुलनेत कमी आहे, असे वाटत असेल तर हा गैरसमज आहे. शहरातील नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघापेक्षा दिंडोरी, कळवण या आदिवासी तालुक्यांमध्ये दर हजार पुरुषांमागे महिला मतदारांचे प्रमाण जास्त आहे.
कळवणमध्ये दर हजार पुरुषांमागे ९६३ महिला मतदार आहेत. नाशिक पश्चिममध्ये हे प्रमाण अवघे ८५६ इतके आहे.(Dindori Kalwan have more female voters than city nashik news)
जिल्हा निवडणूक शाखेच्या मतदार यादी पुनर्रचनेत दोन महिन्यांमध्ये ६५ हजार २५५ महिला मतदारांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण मतदारांची संख्या ४७ लाख ५६ हजार २२५ वर पोचली आहे. त्यात महिला मतदार २२ लाख ७५ हजार ४१७ आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्हा निवडणूक शाखा तयारी करत आहे.
मतदार याद्या पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन मतदारांची नावे जोडली जात आहेत. गत दोन महिन्यांमध्ये नव्याने एक लाख २५ हजार ८५० मतदार वाढले. विशेष म्हणजे शहरातील लोक उच्च शिक्षित असल्याने स्त्री-पुरुष असा भेद करत नाहीत. त्यामुळे स्त्रियांचे प्रमाण शहरात जास्त असू शकते आणि या तुलनेत ग्रामीण भागातील महिलांचे प्रमाण कमी असेल असा सर्वसाधारण समज आहे.
पण, प्रत्यक्षात वस्तुस्थिती काही वेगळीच असून, ग्रामीण भागात महिलांचे प्रमाण शहराच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून येते. दर हजार पुरुष मतदारांमागे महिला मतदारांच्या संख्येत पाचने वाढ होत ती आता ९१७ वर पोचल्याची माहिती निवडणूक उपजिल्हा अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी दिली.
असे आहे महिला मतदारांचे प्रमाण
मालेगाव मध्य ९१८, मालेगाव बाह्य ९००, बागलाण ९०४, नांदगाव ९०२, कळवण ९६३, चांदवड ९०४, येवला ९०४, निफाड ९०५, निफाड ९४२, दिंडोरी ९४३, सिन्नर ९०३, नाशिक पूर्व ९३२, नाशिक मध्य ९५९, नाशिक पश्चिम ८५६, देवळाली ९१८, इगतपुरी ९४६.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.