Dindori Lok Sabha Constituency : दिंडोरीत माजी आमदार गावित, माजी खासदार चव्हाणांची माघार; माघारीनंतर 10 उमेदवार रिंगणात

Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने माकपचे माजी आमदार जे. पी. गावित यांना गळाला लावून मोठी चाल खेळली आहे.
Former MLA from Dindori Lok Sabha Constituency J. P. Gavit withdraw on Monday
Former MLA from Dindori Lok Sabha Constituency J. P. Gavit withdraw on Mondayesakal
Updated on

Nashik News : लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने माकपचे माजी आमदार जे. पी. गावित यांना गळाला लावून मोठी चाल खेळली आहे. महायुतीने त्यांच्याच पक्षाचे माजी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांची बंडखोरी रोखण्यात यश मिळविल्याने ‘झाकली मूठ सव्वालाखाची’ अशी स्थिती झाली आहे. (Dindori Lok Sabha Constituency)

या दोन्ही इच्छुकांसह धोंडिराम थैल, शिवाजी बर्डे, अशोक घुटे अशा एकूण पाच उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता दहा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यातही महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार विरुद्ध महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्यातच दुरंगी लढत रंगण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

उमेदवारी अर्ज माघारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. ६) सकाळपासून उमेदवारांनी गर्दी करण्यास सुरवात केली. भारत आदिवासी पार्टीचे शिवाजी धर्मा बर्डे यांनी सर्वांत पहिले अर्ज मागे घेतला. त्यानंतर माकपचे जे. पी. गावित यांच्यासाठी महाविकास आघाडीचे निफाडचे माजी आमदार अनिल कदम.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, उमराणे बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे, ॲड. तुषार जाधव, इरफान शेख, भूषण शिंदे या वेळी उपस्थित होते. त्यांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे आता महाविकास आघाडीला ‘बुस्ट’ मिळाला आहे. (Latest Marathi News)

Former MLA from Dindori Lok Sabha Constituency J. P. Gavit withdraw on Monday
Nashik Lok Sabha Election : गोडसे, वाजे, भगरेंना ‘सोशल’ प्रचार थांबविण्याची नोटीस!

भाजपनेही माजी खासदार चव्हाणांची बंडखोरी रोखण्यात यश मिळविले. माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर, माजी शहराध्यक्ष गिरीश पालवे, नीलेश बोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत चव्हाणांनी आपला अर्ज मागे घेतला. अनेक वर्षांपासून भाजपमध्ये असल्यामुळे पक्ष त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविणार असल्याची ग्वाही केदा आहेर यांनी या वेळी दिली.

चव्हाणांच्या माघारीमुळे महायुतीचे मतविभाजन टळले आहे. याव्यतिरिक्त बळीराजा पार्टीचे धोंडिराम थैल व अपक्ष उमेदवार अशोक घुटे यांनीही माघार घेतल्यामुळे आता दहा उमेदवार शिल्लक आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात एकूण आठ उमेदवार रिंगणात होते.

Former MLA from Dindori Lok Sabha Constituency J. P. Gavit withdraw on Monday
Nashik Lok Sabha Election : नाशिक, दिंडोरीत ‘तोफा’ धडाडणार; पंतप्रधानांची सभा 17 ला?

"दिंडोरीची जागा माकपला मिळावी, यासाठी आमचा आग्रह होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिला म्हणून आम्ही उमेदवारी अर्ज सादर केला. पण पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर भाजपला पराभूत करायचे असेल, तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे काम केले पाहिजे, असा निर्णय घेण्यात आला. महाविकास आघाडीचा धर्म पाळत उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे." - जे. पी. गावित, माकप

"लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या काही दिवस अगोदर माझे ऑपरेशन झाल्यामुळे आवाज बसला आहे. त्यात एक ते दीड महिन्यांत सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु आवाज काही व्यवस्थित झाला नाही. परिणामी आरोग्याच्या कारणास्तव उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेनुसार उमेदवाराचे काम करणार आहे."- हरिश्‍चंद्र चव्हाण, भाजप

Former MLA from Dindori Lok Sabha Constituency J. P. Gavit withdraw on Monday
Nashik News : शहर पोलिसांसाठी नवीन ‘ताफा’! थारसह 66 चारचाकी; 62 दुचाक्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.