Dindori Lok Sabha Constituency : मंगळवारपासून दिंडोरीचा राजकीय आखाडा तापणार! महायुती, महाविकास आघाडीचे नेते मतदारसंघात ठोकणार तळ

Lok Sabha Constituency : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसह राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आदींच्या सभा होत आहे. तर, महायुती व महाविकास आघाडीतील अनेक बडे नेते मतदारसंघात तळ ठोकूण असणार आहे.
Sharad Pawar , Prime Minister Narendra Modi, Uddhav Thackeray
Sharad Pawar , Prime Minister Narendra Modi, Uddhav Thackerayesakal
Updated on

Nashik News : जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढत असताना आता चौथ्या टप्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पुढील आठवडयात राजकीय आखाडा तापणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसह राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आदींच्या सभा होत आहे. तर, महायुती व महाविकास आघाडीतील अनेक बडे नेते मतदारसंघात तळ ठोकूण असणार आहे. (Dindori Lok Sabha Constituency)

त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांची राळ उठणार आहे. राज्यात चौथ्या टप्यात १३ मे रोजी मतदान होत असून त्यासाठी शनिवारी (ता.११) प्रचारतोफा थंडावतील. ही मतदान प्रक्रीया झाल्यानंतर, पाचव्या टप्यातील मतदारसंघाकडे राजकीय पक्षांचे लक्ष केंद्रीत होणार आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघ पाचव्या टप्यात येत असून, पुढील आठवड्यात मंगळवारपासून (ता.१४) राजकीय नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू होणार आहे.

महायुतीच्या उमेदवारांसाठी १५ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथे दुपारी २.३० वाजता सभा घेणार आहे. त्याचदिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिंडोरी तालुक्यातील वणी येथे सभा होईल. शरद पवार दोन दिवस नाशिकला तळ ठोकून असणार आहेत. १६ मे रोजी पवार यांच्या उपस्थितीत नांदगाव तालुक्यातील मनमाड येथे सभा होणार आहे.

शिवसेना (उबाठा)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व पवार यांची एकत्र सभा घेण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असून ती सभा सटाणा येथे होईल असे बोलले जात आहे. ही १६ मे रोजी ही सभा होण्याचा अंदाज आहे. याशिवाय महायुतीच्या उमेदवारांसाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी १७ मे रोजी चांदवड येथे सभा घेणार आहे. (latest marathi news)

Sharad Pawar , Prime Minister Narendra Modi, Uddhav Thackeray
Dindori Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पवार कुटुंबाचे मनोमिलन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजीमंत्री पंकजा मुंडे, खासदार नवनीत राणा, आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांच्या १६ ते १९ मे दरम्यान सभा होत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील.

खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळाचे नेते बाळासााहेब थोरात, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे. सुप्रिया सुळे व अमोल कोल्हे नाशिकला दोन दिवस असणार आहेत.

Sharad Pawar , Prime Minister Narendra Modi, Uddhav Thackeray
Dindori Lok Sabha Election : 2 मतदान केंद्रांचे अंतर सव्वादोनशे किलोमीटर; जळगाव आणि अहमदनगरच्या हद्दीपर्यंत विस्तार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.