Dindori Lok Sabha Constituency : उठविलेली कांदा निर्यातबंदी दिंडोरीत भाजपला तारणार का? विरोधकांना शोधावा लागेल नवा मुद्दा

Lok Sabha Constituency : भाजपाच्या बैठकीत कांदा प्रश्नच ऐरणीवर राहिला होता. त्यामुळे कांद्यावरून झालेली कोंडी फोडण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवली आहे.
Onion
Onion esakal
Updated on

Nashik News : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कांद्याचा प्रश्न केंद्रस्थानी होता. अगदी, सोशल मिडिया असो की, विरोधक यांच्याकडून कांदा प्रश्नावर सत्ताधारी भाजपची कोंडी केली जात होती. यातच भाजपाच्या बैठकीत कांदा प्रश्नच ऐरणीवर राहिला होता. (Dindori Lok Sabha Constituency)

त्यामुळे कांद्यावरून झालेली कोंडी फोडण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवली आहे. निर्यातबंदी उठवल्याच्या पहिल्याच दिवशी कांद्याच्या दरात सरासरी ५०० रूपयांनी वाढ झाली आहे. कांदा निर्यातबंदी उठल्याने आता विरोधकांना नवीन मुद्दा शोधावा लागणार आहे. त्यामुळे उठविलेली कांदा निर्यातबंदी ही भाजपला दिंडोरीत तारणार का हे बघणे उत्सुकतेचे राहणार आहे.

केंद्र शासनाने डिसेंबरच्या प्रारंभी कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारणी केली होती. त्यानंतर ७ डिसेंबरला कांदा निर्यातबंदी जाहीर केली. यावेळी पणन मंत्रालयाने घेतलेला निर्णय ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू राहील, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रस्त करणाऱ्या या विषयावर दिलासा देण्यासाठी किमान ३१ मार्चनंतर कांदा निर्यातीसाठी खुला होईल अशी अपेक्षा होती.

मात्र, मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात केंद्र शासनाने नव्याने नोटिफिकेशन जारी करून निर्यातबंदी यापुढेही सुरूच राहील, असे स्पष्ट केले आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. या नाराजीचा फायदा उठवत भाजप विरोधकांनी सरकारविरोधात रान पेटवले होते. (Latest Marathi News)

Onion
Nashik Loksabha: शिंदे यांच्या आग्रहामुळे भुजबळांनी केली तलवार म्यान

केंद्र शासन शेतकऱ्यांना कोणताही दिलासा देत नाही. उलट त्यांच्या खिशातील पैसाही काढून घेत आहे, या पद्धतीने विरोधकांनी निवडणुकीत प्रचार सुरू केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी चांदवडमध्ये येऊन रास्ता रोको आंदोलन केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यावर चांदवड येथे या प्रश्नावर खास शेतकरी मेळावा घेत, मुद्दाला हात घातला होता.

तसेच कांदा निफाड तालुक्यात येऊन शरद पवार यांनी जाहीर सभा घेत या प्रश्नावर रणशिंग फुंकले. त्यामुळे केंद्र सरकार विरोधात विरोधकांकडून या मुद्द्याचे भांडवल सुरू होते. यातच निर्यातबंदी कायम ठेवल्याने विरोधी पक्षांना आयता मुद्दा मिळाल्याने दिंडोरी मतदारसंघात भाजपची पुरती कोंडी झाली होती.

प्रचाराच्या पहिल्या टप्यात कांदा निर्यातबंदी या विषयावर भाजप नेत्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली जात होती. विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता. सोशल मिडियावर देखील कांदाप्रश्नी भाजपला टार्गेट केले जात होते. विरोधकच काय तर, भाजप पदाधिकाऱ्यांनी कांदा प्रश्नांचा धसका घेतला होता.

Onion
Nashik Lok Sabha Constituency : नाशिकमध्ये 39 तर दिंडोरीत 20 उमेदवारांचे अर्ज; प्राप्त अर्जाची आज छाननी

पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कांदा आम्हाला रडवतोय अशी व्यथा बोलून दाखविली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तिसऱ्या टप्यातील मतदानापूर्वी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे निवडणूक प्रचारातील कांदा हा मुद्दा मागे पडणार असून विरोधकांना नवीन मुद्दे शोधावे लागणार आहेत. आता या मुद्द्याचा भाजप उमेदवार व कार्यकर्ते फायदा उठवतात, की विरोधकांच्या प्रचाराच्या मुद्द्यांना बळी पडतात, हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे.

Onion
Nashik Lok Sabha Constituency : विजय करंजकरांच्या आजच्या मेळाव्याकडे लक्ष! 4 जि. प. सदस्यांचा पाठिंब्याचा दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.