Dindori Lok Sabha Election 2024 : दिंडोरी मतदारसंघातील शेतकऱ्यांची नाराजी भाजपला भोवणार? कोणते मुद्दे ठरणार प्रभावी

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या दिंडोरी मतदारसंघात लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये एक महत्वपूर्ण लढत होत आहे.
Dindori Lok Sabha Election 2024 BJP Bharati Pawar Vs bhaskar Bhagare key points politics explained rak94
Dindori Lok Sabha Election 2024 BJP Bharati Pawar Vs bhaskar Bhagare key points politics explained rak94
Updated on

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या दिंडोरी मतदारसंघात लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये एक महत्वपूर्ण लढत होत आहे. या मतदारसंघात भाजपने केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांना महायुतीकडून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने त्याच भागातील आणि तुल्यबळ उमेदवार डॉ. भास्कर भगरे यांना उभे केले आहे.

२००९ मध्ये या मतदारसंघाची निर्मीती झाली असून तेव्हापासून या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. २०१९ साली राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. मतदारसंघाबद्दल बोलायचे झाले तर आदिवासींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात खुल्या प्रवर्गातील मतदारांची संख्या जास्त असल्याचे पाहायला मिळते.

या मतदारसंघात असलेल्या सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत, त्यांची मदत भारती पवार यांना जिंकून येण्यात होईल अशी अपेक्षा आहे. मात्र या आमदारांकडून फारसे जनतेचे प्रश्न सोडवले गेले नसल्याने सध्या येथे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष पाहायला मिळत आहे.

Dindori Lok Sabha Election 2024 BJP Bharati Pawar Vs bhaskar Bhagare key points politics explained rak94
Raj Thackeray: मराठीला अभिजात दर्जा, मराठ्यांचा इतिहास अन् मुंबई-गोवा महामार्ग...; राज ठाकरेंनी मोदींकडं व्यक्त केल्या ७ अपेक्षा

दिंडोरी मतदारसंघातील सर्वच्या सर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार असून देखील भास्कर भगरे यांनी भारती पवार यांच्यासमोर कडवं आव्हान उभं केलं आहे.

दिंडोरी मतदारसंघ हा शेतकरी बहुल आहे आणि सध्या येथील शेतकऱ्यांचे प्रश्न ज्वलंत बनले आहेत. येथे द्राक्ष उत्पादक मोठ्या प्रमाणात आहेत, तसेच दिंडोरी कांद्याचे आगर म्हणून देखील ओळखले जाते. केंद्र सरकारची निर्यातीसंबंधीची धोरणे हे येथील शेतकऱ्यांशी निगडीत आहेत. केंद्र किंवा राज्य सरकारच्या निर्णयाचा थेट परिणाम येथील शेतकऱ्यांवर होतो.

केंद्र सरकारने केलेली कांदा निर्यातबंदी याचा येथील कांदा उत्पादक आणि शेतकऱ्यांवर मोठा परिणाम झाला आहे. कांदा निर्यातीवर लावलेले निर्यातशुल्क यामुळे येथील व्यापारी आणि शेतकरी चांगलेच नाराज आहेत. त्याचा फटका भाजपला येथे बसण्याची शक्यता आहे.

Dindori Lok Sabha Election 2024 BJP Bharati Pawar Vs bhaskar Bhagare key points politics explained rak94
Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

२०१९ मध्ये देखील महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत झाली होती. त्या निवडणुकीत वंचितने देखील उमेदवार दिला होता सोबतच माकपचे जे पी गावीत देखील निवडणुकीच्या रिंगणात उभे होते, त्यामुळे मतांची विभागणी होऊन भारती पवार निवडूण आल्या होत्या. यावेळी मात्र माकपने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मतांची विभागणी टळणार आहे.

आजपर्यंत कोकणा समाजाचे उमेदवार या मतदारसंघात दिले जात आले आहेत. पण यावेळी यामध्ये बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीने कोकणा समाजाच्या भारती पवारांना उमेदवारी दिली आहे, दिंडोरी मतदारसंघात जवळपास चार लाख मतदान या समाजाचे आहे. तर त्यांच्या विरोधात असलेले भास्कर भगरे हे आदिवासी कोळी समाजाचे आहेत. या समाजाचं मतदान तुलनेने कमी आहे. १८ लाख ५३ हजार मतदारांमध्ये येथे मराठा समाजाचे प्राबल्य दिसून येते. त्यामुळे यांच्या मतांचा प्रभाव या मतदारसंघात दिसणार आहे. मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन हा देखील मुद्दा येथे महत्वाचा ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.