Dinesh Kumar Bagul Bribe Case : पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ

Bribe Crime News
Bribe Crime Newsesakal
Updated on

नाशिक : आदिवासी विकास विभागाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागूल यांच्या पोलिस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली. हरसूल येथील सेंट्रल किचनच्या कार्यारंभ आदेशापोटी बागूल यांना २८ लाख ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (ता. २५) रंगेहाथ अटक केली होती.

दरम्यान, बागूल यांचे नाशिक व धुळ्यात बँकेत लॉकर नसल्याची बाब तपासात समोर आली असून, पुण्यातील माहिती पथक घेत असल्याने त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पुन्हा कोठडी सुनावली. (Dinesh Kumar Bribe Case 2 days extension in police custody Nashik Latest Marathi News)

Bribe Crime News
12वीनंतरच्‍या पदविकेच्‍या अभ्यासक्रमासाठी शुक्रवारपर्यंत मुदत

कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागूल यांना मंगळवारी (ता. ३०) जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, त्यांच्या कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली. बागूल यांनी आदिवासी विभागामार्फत उभारण्यात येणाऱ्या दोन कोटी ४० लाखांच्या सेंट्रल किचनसाठीच्या कार्यारंभ आदेशासाठी १२ टक्क्यांप्रमाणे २८ लाख ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बागूल यांना त्यांच्या तिडके कॉलनीतील नयनतारा सोसायटीत निवासस्थानी लाचेची रक्कम स्वीकारताना अटक केली. त्यांच्या घरझडतीत ९८ लाख ६३ हजार रुपयांची रोकड, तर पुण्यातील फ्लॅटमध्ये ४५ लाख ४० हजार रुपयांची रोकड आढळली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बागूल यांच्या गुन्ह्यासंबंधी नाशिक व धुळे येथील तपास पूर्ण केला असून, तिथे त्यांचे बँक लॉकर व रोकड आढळून आलेली नाही.

पुण्यात त्यांची काही स्थावर व जंगम मालमत्ता, रोकड आहे का, याचा तपास सुरू आहे, अशी माहिती एसीबीचे पोलिस निरीक्षक अनिल बागूल यांनी दिली. याबाबत न्यायालयात युक्तिवाद करण्यात आल्यानंतर बागूल यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली.

Bribe Crime News
Nashik : कंत्राटी कर्मचारी नियुक्तीमागे ‘वडजे’ला लाचेची लालसा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.