Nashik Political: दिनकर पाटील यांना भाजपने उमेदवारी द्यावी; महानुभाव पंथ, वारकरी मंडळाचे ज्येष्ठांना साकडे

सातपूर येथे भाजपचे ज्येष्ठ नेते दिनकर पाटील यांच्या संपर्क कार्यालयात ही पत्रकार परिषद झाली.
Representatives of both organizations handing over the letter of support signed by Mahant Vidwans Shyamsundar Shastri, President of All India Mahanubhava Parishad and Prakash Bodhale Maharaj, National President of All India Warkari Mandal to Dinkar Patil.
Representatives of both organizations handing over the letter of support signed by Mahant Vidwans Shyamsundar Shastri, President of All India Mahanubhava Parishad and Prakash Bodhale Maharaj, National President of All India Warkari Mandal to Dinkar Patil.esakal
Updated on

नाशिक : भाजप नेते दिनकर पाटील यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, यासंदर्भात त्याचा भाजपला उत्तर महाराष्ट्रासह राज्यात फायदा होईल, असे अखिल भारतीय महानुभाव परिषद आणि अखिल भारतीय वारकरी महामंडळाने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

यासंदर्भात भाजप वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचे भाजप आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाप्रमुख निवृत्ती महाराज रायते यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सांगितले. (Dinkar Patil should nominated by BJP Mahanubhav Panth Varkari Mandal request to seniors Nashik)

सातपूर येथे भाजपचे ज्येष्ठ नेते दिनकर पाटील यांच्या संपर्क कार्यालयात ही पत्रकार परिषद झाली.

बाळासाहेब महाराज शिरसाठ, निवृत्ती महाराज चव्हाण, संजय महाराज शिंदे, भास्कराचार्य महाराज रसाळ, जनार्दन महाराज काकडे, सुभाष महाराज जाधव, कैलास महाराज घुगे, गोकुळ महाराज तपकिरे, गजानन राठोड, शांताराम खांदवे, सुनील निघोट, सजन महाराज फड, महंत कृष्णराजबाबा मराठे, महंत सायराजबाबा लोणारकर, वाऱ्हेराजबाबा पातोरकर, भाईमुनीबाबा महानुभाव, अतुल महाराज आदी उपस्थित होते.

श्री. रायते म्हणाले, की नाशिक लोकसभा मतदारसंघात दिनकर पाटील यांच्यासारख्या व्यक्तीची गरज आहे. वारकरी संप्रदायासह सर्वांचे धार्मिक, सामाजिक प्रश्न गेल्या ४० वर्षांपासून हिरिरीने सोडवत आहेत. त्यामुळे आमच्या दोन्ही संप्रदाय तथा पंथाची इच्छा आहे, की त्यांना लोकसभेची भाजपने उमेदवारी द्यावी.

Representatives of both organizations handing over the letter of support signed by Mahant Vidwans Shyamsundar Shastri, President of All India Mahanubhava Parishad and Prakash Bodhale Maharaj, National President of All India Warkari Mandal to Dinkar Patil.
Political News: भाजपला बुस्ट देण्यासाठी नवी मुंबईत 'या' अभियानाला झाली सरुवात; नागरिकांचा मिळतोय प्रतिसाद

दोन्ही आध्यात्मिक मार्ग हे दिनकर पाटील यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आमची प्रचंड संख्येने मते आहेत. त्यामुळे दोन्ही संप्रदायाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी पाठिंब्याचे पत्रे नाशिक जिल्हाध्यक्षांना दिली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन यासंदर्भातील मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.

अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत विद्वांस श्यामसुंदर शास्त्री आणि अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश बोधले महाराज यांच्या स्वाक्षरीचे या संदर्भातील पत्र वरिष्ठ नेत्यांना देण्यात येणार आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात दोन्ही संप्रदायांचे प्रत्येकी दोन लाख अनुयायी आहेत. त्यामुळे दिनकर पाटील यांना उमेदवारी दिल्यास त्याचा फायदा भाजपला निश्चितपणाने होईल.

वारकरी संप्रदाय आणि महानुभाव संप्रदाय देशातील ही एकमेव जागा अधिकारवाणीने मागत आहे, असेही ते म्हणाले. भाईदेवमुनी महानुभाव, निवृत्तीबाबा रायते, महंत कृष्णराजबाबा मराठे, भास्कराचार्य महाराज रसाळ यांनीही या मागणीचे समर्थन केले.

Representatives of both organizations handing over the letter of support signed by Mahant Vidwans Shyamsundar Shastri, President of All India Mahanubhava Parishad and Prakash Bodhale Maharaj, National President of All India Warkari Mandal to Dinkar Patil.
SAKAL Impact: मालेगाव वीजचोरीच्या समूळ उच्चाटनासाठी स्वतंत्र पथक! गृह मंत्रालयाची दखल; विशेष पोलिस महानिरीक्षकांनी दिले आदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.