Onion Export Duty : कांदा, तांदळाच्या कमी निर्यात मूल्यांकनावर नजर; शुल्क वाचविण्याचे प्रकार निदर्शनास

Onion News
Onion Newsesakal
Updated on

Onion Export Duty : देशांतर्गत भावाच्या पार्श्‍वभूमीवर निर्यातीवर कांद्यासाठी चाळीस टक्के आणि उकडलेल्या तांदळासाठी वीस टक्के शुल्क लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. प्रत्यक्षात मात्र निर्यात शुल्क चुकविण्यासाठी निर्यातीचे मूल्य कमी दाखवल्याची बाब आंतर मंत्रालयीन बैठकीत चर्चेत आली आहे.

त्यामुळे अर्थ मंत्रालयाने निर्यातीच्या कांदा आणि उकडलेल्या तांदळाच्या कमी मूल्यांकनावर नजर ठेवण्याचा निर्देश देण्यात आले आहेत. सीमाशुल्क आणि केंद्र कर विभागाच्या आयुक्तांना यासंबंधीचे पत्र लिहिण्यात आले आहे. ( directed to monitor undervaluation of export onion and parboiled rice nashik news)

शिपिंग बिलांमध्ये निर्यातदारांकडून दिल्या जाणाऱ्या मूल्यावर बारकाईने देखरेख करण्यासाठी यंत्रणा असावी. शिवाय आपल्या अधिकाऱ्यांना मूल्यांकन सतर्कतेने केले आहे काय? हे पाहण्यासाठी सतर्क करावे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात शुल्क लागू केल्यावर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुरवात झाली होती.

त्यावर उपाय म्हणून २ हजार ४१० रुपये क्विंटल भावाने कांदा खरेदीचे धोरण ठरवण्यात आले. मात्र त्याचा कांद्याच्या भावावर फारसा परिणाम झालेला नाही. आज कांदा उत्पादक नाशिक जिल्ह्यातील बाजारात कांद्याचा क्विंटलचा सरासरी भाव १ हजार ७५० ते २ हजार रुपयांपर्यंत राहिला.

मुळातच, कांद्याच्या लागवडीवर पावसाने विपरीत परिणाम केल्याने उत्पादनात घट येणार आहे. त्याचवेळी देशाची गरज आणि उपलब्धता याचे सूत्र जुळणार नसल्याने येत्या तीन महिन्यात कांद्याच्या भावात मोठी वाढ होण्याची शक्यता बाजार अभ्यासकांनी व्यक्त केलेली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Onion News
Maharashtra Onion News : भारतीय कांद्याला बांगलादेश बाजारपेठ दुरावण्याची भीती? पाकिस्तानचा कांदा स्वस्त

भारताचा निर्यातीत ३० टक्के वाटा

उकडलेल्या तांदळाच्या निर्यातीत भारताचा २५ ते ३० टक्के वाटा आहे. आफ्रिका, इंडोनेशिया, फिलीफाइन्स, श्रीलंका, बांगलादेश, सिंगापूर, मलेशियामध्ये उकडलेल्या तांदळाची निर्यात होते. उकडलेल्या तांदळावर २० टक्के निर्यात शुल्क लागू करण्यापूर्वी करार केलेल्या निर्यातदारांना १५ ऑक्टोंबरपर्यंत निर्यात शुल्क शून्य राहणार आहे.

१५ ऑक्टोबरपर्यंत देशातील भाताच्या उत्पादनाची नेमकी माहिती मिळाल्यावर केंद्र सरकारकडून पुढील निर्णय घेतला जाऊ शकतो. रशियाने काळ्या समुद्रातील धान्य करारातून बाहेर पडल्यानंतर तीन दिवसांनी सरकारने गैर-बासमती पांढऱ्‍या तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध घातले असताना देशांतर्गत तांदळाच्या किमती चिंताजनक आहे.

एप्रिलपासून देशांतर्गत बाजारात १९ टक्के आणि आंतरराष्ट्रीय बाजारात २६ टक्के वाढले आहे. तांदळाच्या निर्यातीचे प्रमाण २१ टक्के आणि मूल्य ३५ टक्क्यांहून अधिक वाढले.

Onion News
Nashik Onion Rates: मुंगसे उपबाजारात कांद्याला सातशे ते बावीसशेच भाव! 10 हजार क्विंटल कांद्याची आवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.