Nashik News: गौणखनिज प्रकरणाच्या तपासाची दिशा अजूनही ठरेना!

mineral mining file photo
mineral mining file photoesakal
Updated on

नांदगाव (जि. नाशिक) : तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरण गाजल्यानंतर याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळ अधिकारी व तलाठ्यावर निलंबनाची कारवाई झाली तर संबंधित क्रशर चालकाला तीन कोटी ४२ लाखांचा दंड आकारण्यात आला. या प्रकरणामुळे तालुक्यातील अवैध गौण खनिजाची कशी लूट केली जात आहे.

हे सर्वांसमोर आले. या प्रकरणी निलंबन झाले, दंड आकारणी झाली. मात्र आता पुढे तपासाची दिशा काय असेल हे ठरत नसल्याने या प्रकरणी नक्की काय होणार याकडे लक्ष लागून आहे. (direction of investigation of minor mineral case still not decided Nashik News)

तालुक्यातील गणेशनगर येथे होत असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी दोघांवर निलंबनाची कारवाई तर क्रशर चालक याच्याविरुद्ध कोट्यवधीचा दंड ठोठावला. तालुक्यात अवैध उत्खनन होणे हा प्रकार पहिला नाही.

तीन वर्षांपूर्वी मनमाड दौंड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणात वापरण्यात आलेल्या कामातील गौण खनिजाची रॉयल्टी चुकविला प्रकरणी सोळा कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी अद्याप अपूर्ण असून निकाल लागलेला नाही.

या प्रकरणात दंडाची रक्कम कमी करून घेण्यासाठी असलेल्या नियमाचा आधार घेत अशी अपिले दाखल झालेली आहेत. मुळात बेकायदेशीर गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी अधून मधून अशा प्रकारच्या कारवाया होतात. त्याची चांगलीच चर्चा घडते. लाखो, करोडो रुपयाचा दंड घेतला जातो आणि सुरु होतो सुनावणी यांचा प्रवास. वर्षानुवर्ष हेच सुरु असल्याने याबाबत चर्चा होत नाही.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

mineral mining file photo
Nashik Crime News : बहाणा करीत लुबाडलेली भांडी मालेगावमधून हस्तगत; संशयित फरार

मात्र या सर्व गदारोळात गणेशनगरच प्रकरण वेगळ्या धाटणीचे निघाले. माहितीच्या अधिकारात माहिती मिळाली नाही म्हणून तक्रारदार अपिलात गेला व पुढचा सगळा प्लॅन पुढे आला. अन्यथा या प्रकरणाची चर्चाही झाली नसती व कारवाई दूरच राहिली. सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्याचे गांभीर्य समजले आणि गणेशनगर उजेडात आले. पण आता गणेशनगरचे प्रकरण मागील प्रकरणाप्रमाणे होण्याची शक्यता आहे.

गौणखनिज प्रकरणी तालुक्यात असलेले अधिकृत परवाने धारक व त्यांच्याकडून शासकीय तिजोरीत जमा होणारे स्वामित्वधन एकीकडे तर दुसऱ्या बाजूला असलेले अनधिकृत खाणमालक त्यांच्याकडून वसूल होणारा दंड या मुद्द्यावर सध्या हे प्रकरण गाजत असले तरी काही मुद्द्यांकडे तपास यंत्रणेला लक्ष घालावे लागणार आहे.

वस्तुतः एखादा क्रशर सुरु करावयाचा असेल गौण खनिज कर्म अधिकाऱ्यांची मान्यता मिळवावी लागते त्यात वीज जोडणी, प्रदूषण मंडळाची अनुज्ञाप्ती, लागणाऱ्या स्फोटकांसाठीचे रीतसर परवाने अशा विविध पातळ्यांवरील कागदपत्रांचा सोपस्कार बघता तालुक्यातील गौण खनिज प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची खरी गरज आहे.

mineral mining file photo
Malegaon Shivpuran Katha : 7 दिवसात मालेगाव आगाराला 11 लाखाचा नफा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.