Nashik News: दिव्यांग कल्याण विभाग पाचला ‘दिव्यांगांच्या दारी’! नाशिक व मालेगावात नोडल अधिकारी

Maharashtra Shasan
Maharashtra Shasanesakal
Updated on

Nashik News : राज्य शासनामार्फत ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांचे दारी’ अभियान सुरू करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात येत्या ५ सप्टेंबरला शहरातील भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात कार्यक्रम होईल.

त्यासाठी जिल्हा परिषद, नाशिक व मालेगाव महापालिका यांच्यातर्फे तयारी सुरू आहे. यात या अभियानाच्या नियोजनासाठी नाशिक व मालेगाव महापालिकेची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. (Disability Welfare Department 5th Door of Disability Nodal officers in Nashik and Malegaon Nashik News)

दिव्यांग बांधवांमध्ये विविध प्रवर्गातील दिव्यांग असून, त्यातील अनेक जण विभागीय स्तरावर जाऊन आपली तक्रार नोंदवू शकत नाहीत. त्यामुळे शासनाने दिव्यांगांच्या सोयीसाठी हे अभियान सुरू केले आहे.

जिल्हास्तरावरील सर्व विभागाचे अधिकारी, सर्व शासकीय यंत्रणा एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगांच्या तक्रारी जाणून घेतील. नाशिक जिल्हयात ५ सप्टेंबरला हे अभियान राबविण्यात येईल. यासाठी राज्यस्तरीय समिती अध्यक्ष आमदार बच्चू कडू उपस्थित राहणार आहेत.

अभियान नियोजनासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली. या अभियानाची आर्थिक व अन्य नियोजनात्मक जबाबदारी ही नाशिक व मालेगाव महापालिकेवर सोपविली आहे.

त्यासाठी महापालिका, जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांची बारा नोडल अधिकारी तसेच ३६ सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली. यात प्रत्येकावर नियोजनाची जबाबदारी निश्चित करून देण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Maharashtra Shasan
Nashik News: कळमुस्ते, चिमणपाडाच्या प्रवाही वळण योजनेस मान्यता! गोदावरी खोऱ्यामध्ये वळविणार इतके पाणी

अभियानाचे योग्य नियोजन करा : शर्मा

नियुक्त नोडल अधिकाऱ्यांनी अभियानाच्या यशस्वीतेसाठी नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या आहेत. त्यासाठी मंगळवारी (ता. २९) आढावा बैठक झाली.

या अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर, नाशिक येथे होईल.

तालुक्यातील दिव्यांग बांधवांना आणताना त्यांच्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात यावा. समन्वयाने जिल्हास्तरीय कार्यक्रम यशस्वीतेसाठी नियोजन करण्यात यावे, असेही शर्मा यांनी सांगितले.

Maharashtra Shasan
Nashik: शहरात NMCकडून ‘मिशन पार्किंग’! हॉटेल बाहेर रस्त्यावर उभ्या वाहनांवर चार्जेस आकारण्याचे विचाराधीन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.