Nashik News: दिव्यांग निंबा सावंत यांची खडतर प्रवासातून भरारी! थेट मलेशियात अभ्यास दौऱ्यावर नियुक्ती

Insurance officer handing over Malaysia study tour letter to Divyang Nimba Sawant's wife Sunita Sawant.
Insurance officer handing over Malaysia study tour letter to Divyang Nimba Sawant's wife Sunita Sawant.esakal
Updated on

अंबासन (जि. नाशिक) : 'संघर्ष की रात जितनी ज्यादा अंधेरी होती है, सफलता का सूरज उतना ही तेज चमकता है'... या ओळीप्रमाणेच अतिशय प्रतिकूल परिस्थितीत दिव्यांग निंबा झिंगा सावंत यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर हातात काठीचा आधार घेऊन त्यांनी गगन भरारी घेतली आहे.

तलाठी कार्यालयापासून, तहसील कार्यालय, शेती व एलआयसी विमा प्रतिनिधी हा प्रवास थक्क करणारा असूनही सलग दुसऱ्यांदा त्यांनी विमा कंपनीचे उदिष्ट पूर्ण करून थेट मलेशिया अभ्यास दौऱ्यावर जिल्ह्यात त्यांची निवड झाल्याने परिसरात कौतुक होत आहे. (disabled Nimba Sawant success from tough journey Direct placement on study tour in Malaysia by LIC Nashik News )

झिंगा सावंत हे पत्नी सुलकनबाई हे मोलमजुरी करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांचे तीन अपत्य सयाजी, दिव्यांग निंबा व मुलगी निर्मला. लहान वयातच निंबा यांचे वडील वारले. यामुळे सयाजी व आई सुलकनबाई यांनी शेतातून मोलमजूरीतून निंबा व निर्मला यांचे शिक्षण पूर्ण केले.

या दिव्यांगत्वाला कवटाळून न बसता त्यांनी जिद्दीने शिक्षण सुरू ठेवले. जसजसे दिवसाआड दिवस निघत गेले दिव्यांग निंबा उच्चशिक्षित झाले. मात्र बेताचीच परिस्थितीत नोकरी शोधूनही मिळणे दुरापास्त होऊन बसले होते.

गावातील तलाठी कार्यालयास विनावेतन मदतनीस म्हणून शेतकऱ्यांची बरीच वर्ष सेवा केली. त्यानंतर अनुभवाच्या जोरावर तहसील कार्यालयात काम मिळाले. त्यातच शिकण्याची जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. या नंतर त्यांनी भारतीय जीवन विमा प्रतिनिधी म्हणून परीक्षा दिली.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

Insurance officer handing over Malaysia study tour letter to Divyang Nimba Sawant's wife Sunita Sawant.
मेहनतीच्या बळावर सुदाम गाडेकरांची अमेरिका वारी! LICच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा MDRT पुरस्कार जाहीर

तालुक्यातील नागरिकांचा दांडगा संपर्क असल्याने सलग पाच वर्षांपासून निंबा सावंत यांनी नागरिकांना विमा संरक्षणचे महत्त्व पटवून दिले. सलग दोन वर्षांत भारतीय जीवन विमा कंपनीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याने त्यांना युएसएचा एमडीआरटी दोन वेळा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच भारतीय जीवन विमा कंपनीकडून त्यांची मलेशिया अभ्यास दौऱ्यावर निवड करण्यात आली.

निंबा सावंत यांना हेमंत कासार, प्रवीण देशमुख, प्रशांत आघोर या कार्यालयीन अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले असून तहसील कार्यालय व शेतीत पत्नी सुनीता व आई सुलकनबाई सोबत कष्ट करून दिव्यांगावर खचून न जाता निंबा यांनी जिद्दीने त्यावर मात केली. आलेल्या प्रसंगांना तोंड देत उभे राहून इतरांसमोर एक आदर्श निर्माण केल्याची भावना व्यक्त होत आहेत.

Insurance officer handing over Malaysia study tour letter to Divyang Nimba Sawant's wife Sunita Sawant.
Nashik News | रासाका ऊस उत्पादकांना देणार एकरक्कमी रक्कम : रामभाऊ माळोदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()