नाशिक : माजी कृषीमंत्री दादा भूसे (Dada Bhuse) मालेगाव जिल्हा निर्मितीसाठी प्रयत्नशील असताना त्यांच्याच गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी यासंदर्भात तटस्थ भूमिका घेत काहीही बोलण्यास नकार देताना कानावर हात ठेवले आहे.
यावरून शिंदे गटात मतभेद तर नसावेना या अशी चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. दुसरीकडे कळवणचे आमदार नितीन पवार यांनी मालेगाव जिल्हा निर्मितीत कळवण तालुक्याच्या सहभागाला विरोध दर्शविला आहे. (Disagreement in Shinde Group over Malegaon District Formation Nashik Latest Political News)
नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव जिल्हानिर्मितीसाठी जवळपास साडेतीन दशकांपासून प्रयत्न सुरू आहेत. परंतु मालेगावकरांना जिल्हा हवा असला तरी मालेगाव जिल्ह्यात सहभागी होण्यासाठी इतर तालुके तयार नाहीत.
विशेष करून यापूर्वी चांदवड, नांदगाव तालुक्यांतील नागरिकांनी विरोध केला आहे. जिल्हानिर्मितीचा नारळ फुटण्यापूर्वींच वाद निर्माण होऊन विषय बारगळायचा. परंतु आता पुन्हा मालेगाव जिल्हानिर्मितीचा विषय चर्चेला आला आहे.
महाविकास आघाडीला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांसह स्वतंत्र चूल मांडली व भाजपच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री होत असताना शिंदे यांनी त्यांच्या सोबत आलेल्या चाळीस आमदारांचे मतदारसंघ भक्कम करण्यासाठी त्यांच्या भागाचे दौरे सुरू केले आहेत.
दादा भुसे व सुहास कांदे हे शिंदे यांच्या सोबत गेल्याने ३० जुलैला मालेगावमध्ये विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मालेगावमध्ये प्रथमच बैठक होत असल्याने उत्सुकता आहे. यानिमित्ताने दादा भुसे यांची मतदारांसमोर बाजू मांडताना त्यांचा गड भक्कम करण्याचे प्रयत्न आहेत.
एकीकडे बैठक आयोजित करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मालेगाव जिल्हानिर्मितीचा मुद्दा चर्चेला आणताना प्रशासनाला तसे आदेशित केले. जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रस्ताव मांडताना मालेगाव जिल्ह्यात मालेगावसह नांदगाव, सटाणा, देवळा, चांदवड, कळवण या तालुक्यांचा समावेश केला आहे.
मालेगाव जिल्हा प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याशिवाय मनमाड, नामपूर हे दोन तालुके मालेगाव जिल्ह्यात प्रस्तावित करण्यात आले.
समावेशावरून मतभेद
मालेगाव जिल्ह्यात नांदगाव तालुक्याचा समावेश करावा की नाही, यासंदर्भात शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना विचारण्यात आले. त्या वेळी त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. यावरून जिल्हानिर्मितीवरून शिंदे गटात मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे.
"मालेगाव जिल्ह्यात सहभागी व्हायचे की नाही यासंदर्भात नांदगावमधून मला कोणाचा फोन आला नाही. मालेगाव जिल्ह्यात सहभागी होण्यासाठी किंवा न होण्यासाठीदेखील मला कोणी बोलले नाही. जिल्हानिर्मितीला कोणी विरोध देखील केला नाही. मी एक छोटा कार्यकर्ता आहे. पहिल्यांदाच आमदार झालो आहे. त्यामुळे अशा गोष्टी मला माहीत नाही."
-सुहास कांदे, आमदार, नांदगाव विधानसभा मतदारसंघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.