नाशिक : कधीकाळी वाड्यांचे शहर अशी नाशिकची ओळख होती. कालौघात भाडेकरूंकडून मिळणाऱ्या अल्प भाड्यात वाड्यांची देखभाल करणे अशक्य बनले. त्यातच १९८२ ला नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यावर विविध करांत मोठी वाढ झाली झाल्याने संबंधित मालकांना जुन्या वाड्यांची देखभाल, दुरुस्ती अशक्य बनली.
त्यात काहींनी मिळेल त्या भावात वाडा विकण्यास तर काहींनी दूरदृष्टी दाखवत आहे त्या जागेवरच इमारत बांधण्यास पसंती दिली. यामुळे शहरातील बहुतांश वाड्यांची जागा सिमेंट काँक्रिटच्या इमारतींनी घेतल्याने येथील वाडा संस्कृतीचा खऱ्या अर्थाने लोप झाला आहे. (disappearance of Wada culture in city construction of buildings in place of old palaces in city nashik news)
पांडव व चामर लेणी शहरापासून दूर वाटावी अशी परिस्थिती ऐंशीच्या दशकापर्यंत होती. शालिमार, द्वारका, पंचवटी कारंजा, मखमलाबाद नाका, जुना गंगापूर नाका या परिघापुरतेच शहर सीमित होते.
मात्र, सातपूर औद्योगिक वसाहतीच्या निर्मितीनंतर खऱ्या अर्थाने शहराचा मोठा विस्तार झाला. याच काळात काही बांधकाम व्यावसायिकांच्या दूरदृष्टीने अगदी हप्त्यानेही लहान मोठे प्लॉटस उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे अनेकांनी शहरात दाटीवाटीने राहण्यापेक्षा जवळपास प्लॉट विकत घेऊन स्वतःचे घरकुल बांधण्यास पसंती दिली. अन तेव्हापासून खऱ्या अर्थाने शहर विस्तारत गेले.
जुन्या नाशिकचे महत्त्व टिकून
शहरातील सोमवार पेठ, तिवंधा, पाटील गल्ली, बुधवार पेठ, दिल्ली दरवाजा, दहिपूल, सराफ बाजार, तीळभांडेश्वर लेन, टाकसाळ लेन, भद्रकाली, रविवार कारंजा, तेली गल्ली, लोणार गल्ली, खैरे गल्ली, नवी व जुनी तांबट आळी याच भागात नागरी वस्ती मोठ्या प्रमाणावर होती.
हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली
आता वीस लाख लोकवस्तीचे हे शहर दक्षिणोत्तर पांडव, चामरलेणीच्या पलिकडे पोचले आहे. याशिवाय अनेकांनी महापालिकेत समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागात घरे बांधण्यास पसंती दिली. मात्र शहर सर्वदूर पसरूनही जुन्या नाशिकचे महत्त्व व ओळख टिकून राहिले.
बिझनेस हब
कानडे मारुती लेन, दहिपूल, दिल्ली दरवाजा, शालिमार चौक, रविवार कारंजा, मेनरोड, शालिमार, गोळे कॉलनी, सराफ बाजार, भांडी बाजार, वीर सावरकर पथ, फावडे लेन, वकील वाडी, अशोक स्तंभ हा भाग आज खऱ्या अर्थाने बिझनेस हब बनला आहे.
सहाजिकच या भागातील जुन्या वाड्यांना अधिक मागणी होती. अनेक व्यावसायिकांनी दूरदृष्टी ठेवत आधीच या भागात जुने वाडे खरेदीस पसंती दिली. या परिसरात आज दहा बाय दहाच्या गाळ्यासाठी वीस-तीस लाख मोजावे लागतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.