Sameer Bhujbal: ओबीसी मेळाव्यानंतरच दमानियांचा आरोप; समीर भुजबळ यांचा खुलासा

फर्नांडिस कुटुंबाने राजकारणात न पडण्याचे आवाहन
Sameer Bhujbal speaking at a press conference in Nashik on Sunday.
Sameer Bhujbal speaking at a press conference in Nashik on Sunday.esakal
Updated on

Sameer Bhujbal : राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वातावरण तापलेले असताना ओबीसींच्या मेळाव्यानंतरच अंजली दमानिया यांनी भुजबळ कुटुंबावर राजकीय हेतूने प्रेरित होऊन आरोप केल्याचा पलटवार माजी खासदार समीर भुजबळ यांनी केला आहे.

मुंबईतील जमीन खरेदीत फर्नांडिस कुटुंबीयांनी त्यांच्या राजकारणाला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. (Disclosure of Sameer Bhujbal Damanias accused only after OBC meeting nashik political)

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांबाबत खुलासा करण्यासाठी रविवारी (ता. १९) समीर भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की मुंबईतील बॉम्बे ख्रिश्चन ट्रस्टच्या मालकीची जागा फ्रान्सिस फर्नांडिस हे लीज होल्डर म्हणजे मालक असताना खरेदी केली.

या प्रकरणी कोर्टात फर्नांडिस कुटुंबीयांनी १९९४ मध्ये कन्सेंट टर्म्स फाईल करून सर्वप्रथम मेसर्स पाल्म शेल्टर्स या रहेजा बंधूंच्या कंपनीबरोबर व्यवहार केला होता.

त्यांनी १० वर्षे काहीही काम न केल्याने श्री. व सौ. फर्नांडिस हे नव्या डेव्हलपर्सच्या शोधात असताना फ्रेडरिक नर्होणा या सोसायटीच्या सचिवांनी आमच्या मेसर्स परवेश कन्स्ट्रक्शन या कंपनीला ती जागा विकसित करण्यासाठी दिली.

त्यानुसार रहेजा बंधूंच्या कंपनीबरोबर सर्व कायदेशीर व्यवहार पूर्ण करून व श्री. व सौ. फर्नांडिस यांच्या सहमतीने नर्होणा यांच्या कंपनीशी करार करून फर्नांडिस कुटुंबीयांना त्याच सोसायटीत इतरत्र बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत फ्लॅट देण्याचे ठरले होते. तसा करार करूनच ही जागा विकसित केल्याचे त्यांनी सांगितले.

Sameer Bhujbal speaking at a press conference in Nashik on Sunday.
Maratha Reservation : कुणबी नोंदीचे पुरावे सादर करा - सिध्दाराम सालीमठ

मुळात फर्नांडिस कुटुंबीयांना पैसे देण्याची जबाबदारी रहेजा व नर्होणा यांच्यावर आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबीयांचा आम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करून मदत देऊ करीत आहोत. मात्र, दमानिया त्यांचा राजकारणासाठी वापर करीत आहेत.

त्यांनी केलेले आरोप हे भुजबळ कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठीच असून, वेळ पडली तर त्यांच्याविरोधात न्यायालयात जाण्याची तयारीही आहे, असेही समीर भुजबळ यांनी सांगितले.

खासदार सुळे यांची मध्यस्थी

अंजली दमानिया यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधल्यावर फर्नांडिस कुटुंबीयांना सहानुभूती म्हणून ५० लाखांचा धनादेश दिला. पण, त्यांनी तो बँकेत वटविला नाही. सध्या ही मिळकत ‘ईडी’कडे असल्याचेही समीर भुजबळ यांनी सांगितले.

Sameer Bhujbal speaking at a press conference in Nashik on Sunday.
Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या पाठीमागे राजकीय शक्ती उभी; OBC नेते प्रकाश शेंडगेंचा गंभीर आरोप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()