नाशिक : वैश्विक ओळखपत्रावर एस. टी. बसमध्ये मिळणार सवलत

MSRTC bus
MSRTC busesakal
Updated on

कनाशी (जि. नाशिक) : केंद्र सरकारतर्फे (Central Government) दिव्यांगांना दिले जाणारे वैश्‍विक ओळखपत्र (UDID Card) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये (MSRTC Bus) प्रवास भाडे सवलतीकरीता ग्राह्य धरण्यात यावे, असे राज्याचे महाव्यवस्थापक यांनी पत्राद्वारे कळविले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्याच्या विभाग नियंत्रकांना याबाबत सूचित करण्यात आले आहे. (Get discount on MSRTC Bus on UDID card by central government Nashik News)

MSRTC bus
तापमानात घसरण मात्र घामाच्या धारा कायम

पत्रानुसार सद्यस्थितीत ज्या लाभार्थ्याकडे वैश्‍विक ओळखपत्र आहे अशा लाभार्थ्यांना राष्ट्रीय परिवहन विभागातर्फे प्रवास भाड्यात वाहकाद्वारे सवलत नाकारली जात असून, त्यास प्रवासादरम्यान बसमधून उतरविले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारतर्फे दिव्यांगांना दिले जाणारे वैश्‍विक ओळखपत्र (UDID Card) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये प्रवास भाडे सवलतीकरीता ग्राह्य धरण्यात यावे, याबाबत आपल्या विभागातील सर्व आगार व्यवस्थापक, पर्यवेक्षीय कर्मचारी, वाहकांना सूचना देण्यात याव्यात व याबाबत कोणतीही प्रवासी तक्रार उद्‌भवणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी, असे पत्रकात नमूद केले आहे.

MSRTC bus
RTE ची प्रक्रिया खोळंबली; पुढील प्रवेश वेळापत्रकाची प्रतीक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.