नैताळे : नाशिक औरंगाबाद या महामार्गावर असलेल्या नैताळे येथे श्री मतोबा महाराज यात्रा सुरू आहे.आज मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात समाजकंटकांनी गावाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या गणेश मंदिरात जाऊन गणेश मूर्तीची विटंबना केली आहेत.
ही बाब ग्रामस्थांच्या सकाळी लक्षात येताच संतप्त ग्रामस्थांनी नाशिक औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले घटनेचे गांभीर्य लक्षात घेता निफाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद पटारे आपल्या फौज फाट्यासह आंदोलन स्थळी तातडीने दाखल झाले. (Disgrace of Ganesha idol Naitale Block way of angry villagers Rasta Roko protest called off after Niphad promised police action Nashik News)
संतप्त ग्रामस्थांना अज्ञात समाजकंटकविरुद्ध कारवाईचे आश्वासन दिले व रास्ता रोको आंदोलन मागे घेण्याची विनंती केली तसेच गावात यात्रा चालू असल्याने शांतता राखण्याची विनंती केली.
यानंतर पोलिसांच्या आश्वासनानंतर संतप्त ग्रामस्थांनी आपले रास्ता रोको आंदोलन तातडीने मागे घेतले.त्यानंतर निफाड पोलीस समाजकंटक याचा शोध घेत आहेत नैताळे ग्रामस्थांच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.