CM Shinde Group : कार्यकारिणी बरखास्तीमुळे शिंदे गटात धुसफुस! विधानसभेचे उमेदवार निश्चित करतानाही अडचण

CM Eknath Shinde Group News
CM Eknath Shinde Group News esakal
Updated on

CM Eknath Shinde Group : बारा माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पारडे जड झालेल्या शिंदे गटात आता धुसफूस सुरू झाली आहे. पक्षात नव्याने प्रवेश करणाऱ्यांना मोठी पदे दिली जाणार असल्याचे निमित्त यामागे आहे.

त्याच अनुषंगाने नाशिक जिल्हा महिला आघाडीची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय सचिव संजय मोरे यांनी घेतला. ismissal of executive in Shinde group Difficulty even in deciding Assembly candidates nashik political news)

CM Eknath Shinde Group News
Jalgaon Politics News : ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या त्यागामुळे भाजप जगात क्रमांक एकवर : सुरेश भोळे

मागील वर्षाच्या जून महिन्यात राज्यातील महाविकास आघाडीत फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 40 आमदार वेगळे झाले व स्वतंत्र गट स्थापन केला. गट स्थापनेनंतर भाजपच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन झाले व मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांची वर्णी लागली.

त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना पक्ष व चिन्हावरच दावा केला. १६ आमदारांना अपात्र करण्याबरोबरच शिवसेनेच्या चिन्हाचा वाद न्यायालयात पोचला. निवडणूक आयोगाने तर चिन्हाचा निकाल शिंदे घाटाच्या बाजूने दिला.

एकीकडे राज्य सरकार चालू होत असताना मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून गट भक्कम करण्याचे प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना नाशिकमध्ये सुरवातीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र जवळपास 15 माजी नगरसेवकांनी प्रवेश केल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाची ताकद वाढली.

शिंदे गटाची ताकद सध्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र एकीकडे ताकद वाढत असताना दुसरीकडे पक्षांतर्गत धुसफुसदेखील वाढली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी नुकताच शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला.

त्यामुळे पक्षांतर्गत धुसफुस अधिक वाढली असून नव्याने प्रवेश केलेल्या महिलांना शिंदे गटाची महत्त्वाची पदे दिली जाण्याची शक्यता असल्याने यातून वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे वरिष्ठांनी दखल घेत शिवसेनेची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

CM Eknath Shinde Group News
Maharashtra Politics: अजित पवारांच्या बोलण्याचा CM शिंदेंवर इम्पॅक्ट; पाहुणचार खर्चाला कात्री

यानिमित्ताने शिवसेनेच्या शिंदे गटातदेखील जुने व नवे असा वाद सुरू झाला आहे. जेमतेम दहा महिन्याचा पक्ष असला तरी सुरवातीला ज्यांनी प्रवेश केला ते स्वतःला जुने मानत असून नव्याने प्रवेश करणाऱ्यांना तशी वागणूक मिळत आहे. महिला गटातील पदांवरून शिवजयंतीला पंचवटी कारंजा येथे दोन महिलांमध्ये शिवीगाळदेखील झाली होती.

ताकदवान उमेदवाराची चाचपणी सुरू

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानेदेखील शिवसेनेच्या शिंदे गटाकडून चाचपणी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून मागील आठवड्यात ४ एप्रिलला रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर बैठक झाली. त्या बैठकीत नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांबाबत चर्चा झाली.

मालेगाव बाह्य मतदारसंघामध्ये पालकमंत्री दादा भुसे, तर नांदगावमधून सुहास कांदे यांची उमेदवारी निश्चित असली तरी नाशिक शहरातील तीन विधानसभा मतदारसंघ वगळता देवळाली, दिंडोरी, सिन्नर, इगतपुरी या मतदारसंघातील नावावरून अडचण झाल्याचे समजते.

देवळालीतून तनुजा घोलप, दिंडोरीतून धनराज महाले, सिन्नरमधून उदय सांगळे, तर इगतपुरीतून काशिनाथ मेंगाळ यांच्याविरोधात तक्रारी गेल्याने यांच्यापेक्षा अधिक ताकदवान उमेदवाराची चाचपणी सुरु झाली आहे.

CM Eknath Shinde Group News
Politics: ठिकाण ठरलं! पुण्यात होणार वज्रमूठ सभा, या दिग्गज नेत्याकडे जबाबदारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.