Nashik Road Damage: खड्डेमय रस्त्यांवरून रंगला कलगीतुरा! दुर्दशेवरून NMC, स्मार्टसिटीचे एकमेकाकडे बोट

potholes file photo
potholes file photoesakal
Updated on

Nashik Road Damage : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून महापालिका व स्मार्टसिटी कंपनीमध्ये कलगीतुरा रंगला आहे. महापालिकेने खड्ड्यांना स्मार्टसिटी कंपनीला जबाबदार धरल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

रस्त्यांची तोडफोड फी अदा केली जात असल्याने महापालिकेची खड्डे बुजविण्याची जबाबदारी असल्याची भूमिका स्मार्टसिटी कंपनीने घेतली आहे. (dispute from potholed roads NMC SmartCity boat to each other from predicament nashik)

शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत पालकमंत्री दादा भुसे यांनी महापालिकेला खड्डे बुजविण्यासाठी १५ दिवसांचा अल्टिमेटम दिल्यानंतर आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी बांधकाम विभागाला खड्डे बुजविण्याच्या सूचना दिल्या.

बांधकाम विभागाकडून विभागनिहाय शहरातील खड्ड्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. खड्डे शोधमोहिम राबविण्यासाठी उपअभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली पथके स्थापन करण्यात आली.

परंतु स्मार्टसिटी कंपनीमार्फत ज्या भागात कामे सुरु आहेत, त्या भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून स्मार्टसिटी कामाच्या दिरंगाईचा दोष महापालिकेवर ढकलला जात असल्याचा आरोप होत आहे.

स्मार्टसिटी कंपनीमार्फत गावठाणात विविध कामे सुरू आहेत. स्मार्टसिटी कंपनीकडून गावठाणात जवळपास १९४ रस्त्यांची कामे सुरू आहेत. गावठाणातील जवळपास ९४ रस्ते रुंद, तर उर्वरित अरुंद आहे.

अरुंद रस्त्यांची रुंदी अनेक ठिकाणी तीन ते चार मीटर आहे. त्यामुळे अशा रस्त्यांवर कामे करताना अडचण येत असल्याने कामांना विलंब होत असल्याचा प्रतिवाद स्मार्टसिटी कंपनीकडून केला जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

potholes file photo
Nashik News: केरळच्या तरुणाकडून 280 गडकोट सर

स्मार्टसिटी कंपनीला पत्र

पालकमंत्री दादा भुसे यांनी महापालिकेला खड्डे बुजविण्यासाठी १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी बांधकाम विभागाला सूचना दिल्या. बांधकाम विभागाकडून शहरातील खड्ड्यांचे विभागनिहाय सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

प्रत्येक विभागात उपअभियंता व दोन कर्मचारी आहेत. सर्वेक्षणानंतर अहवाल सादर केला जाणार आहे. खड्डे बुजविण्यासाठी प्रत्येक विभागासाठी तीन ठेकेदार नियुक्त करण्यात आले आहे.

स्मार्टसिटी कंपनीकडून सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडून अल्टिमेटम देण्यात आला आहे.

ठेकेदारांना वारंवार मुदतवाढ न देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. स्मार्टसिटी कंपनीने तयार केलेल्या रस्त्यांवरील खड्डे पंधरा दिवसात बुजविण्याचे पत्र देण्यात आले आहे.

potholes file photo
PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’च्या लाभासाठी मोहीम; धनंजय मुंडेंनी फर्मान सोडल्यावर जागा झाला कृषी विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.