रेल्वे प्रिमियम पार्किंगवरून वाद; प्रवाशाची थेट पोलिस स्टेशनला तक्रार

Nashik Road railway station
Nashik Road railway stationesakal
Updated on

नाशिक रोड : नाशिक रोड रेल्वे स्थानकावर (Nashik road Railway station) सध्या प्रीमीयम पार्किंगमुळे (Premium Parking) अनेक वाद निर्माण होत आहे. गेल्या दहा दिवसात किरकोळ घटनांसह दोन प्रवाशांनी पोलिसात पार्किंग कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. हे वाद नित्याचेच ठरलेले असून, प्रवाशांनी वाहन पार्क करताना चौकशी करून गाड्या लावाव्या, असे आवाहन करण्यात येत आहे. (Disputes over premium parking at Nashik Road Railway Station Nashik News)

नाशिक रोड रेल्वे स्थानकात प्रवेशद्वारावरच पार्किंग आहे. ही प्रीमीयम पार्किंग तासांवर महसूल वसूल करते. आठ दिवसापूर्वी गाडी लावण्याच्या वादातून युवकांना शिवीगाळ झाली होती. नाशिक रोड पोलिस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल करण्यात आली होती. दोन दिवसापूर्वी पार्किंगच्या वादातून कर्मचारी व प्रवाशांमध्ये मारामारी झाली. मारामारीत प्रवाशाच्या कानशिलात लगावली. याने त्याला गंभीर दुखापत झाली आहे. प्रवाशाने कर्मचाऱ्यांची तक्रार नाशिक रोड पोलिस स्टेशनला केली आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या दोन नंबर प्रवेशद्वारावर सध्या प्रीमीयम पार्किंग आहे. या ठिकाणी रोजच वाद होत असून, येथील कर्मचाऱ्यांना पोलिस विभागाने तंबी देण्याची मागणी होत आहे. या पार्किंगचा दर दोन तासाला वीस रुपये आहे.

अनेक लोक येथे गाड्या लावून बाहेरगावी जातात, मात्र आल्यावर पार्किंग कर्मचाऱ्यांशी वाद घालतात. अनेक वेळा या ठिकाणी लावलेला बोर्ड प्रवासी वाचत नाही. अनेक वेळा एका दिवसाचे 100 ते 120 रुपये मोजावे लागतात. पर्यायाने वाद उद्भवतो. प्रीमीयम पार्किंग ही इतर पार्किंगपेक्षा महागडी आहे. कारण ही पार्किंग प्रवेशद्वारावर असल्यामुळे केवळ एक किंवा दोन तासासाठी प्रवाशांना सोडायला आलेल्या लोकांची सोय व्हावी म्हणून निर्माण करण्यात आली आहे. म्हणून दर पाहूनच प्रवाशांच्या जोडीदारांनी गाड्या लावाव्या, असे आवाहन करण्यात आले आहे.

Nashik Road railway station
Nashik : शालेय साहित्य खरेदीला लगबग; पाहा PHOTOS

"पार्किंगची पावती हरवली, मात्र कर्मचाऱ्याने थेट हाणामारी केली. पर्यायाने नाशिक रोड पोलिसांत तक्रार द्यावी लागली. या ठिकाणी रोजच वादाचे प्रसंग उद्भवतात. यासंबंधी रेल्वेकडे लेखी स्वरूपात तक्रार करणार आहे." - सुमीत शर्मा, तक्रारदार

"किरकोळ कारणावरून प्रवाशांनी वाद घालायला सुरवात केली. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली असून, प्रवासाच्या चुकीमुळे वाद उद्भवला."- राजाभाऊ वानखेडे, पार्किंग ठेकेदार

Nashik Road railway station
‘द झोरोस्ट्रीयन फायर टेंपल’मध्ये 103 वर्षांपासून अग्नी प्रज्वलित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()