Nashik News: गिरणावरील 56 खेडी पाणीयोजनेला ग्रहण; व्हीटी पंप जळाला, जलवाहिन्याही नादुरूस्त

Repair crews pulling out the burnt VT pump that is pumping over the Girna Dam. In the second photo, water is being wasted from a burst water channel near the railway subway in Nandgaon
Repair crews pulling out the burnt VT pump that is pumping over the Girna Dam. In the second photo, water is being wasted from a burst water channel near the railway subway in Nandgaonesakal
Updated on

Nashik News: गिरणा धरणावरील ५६ खेडी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या उद्भव विहिरीवरील शंभर अश्वशक्तीचा व्हीटी पंप जळाल्याने योजनेवरील पाणी पुरवठा विस्कळित झाला आहे. पंपदुरुस्तीसाठी किमान दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागणार असल्याने ऐन दिवाळीच्या सणासुदीत पिण्याचे पाणी मिळणार नसल्याने पाण्यासाठी यातायात करण्याची वेळ गृहिणींवर आली आहे.

योजनेवरील वारंवार उदभवणाऱ्या गळत्यांमुळे अगोदरच ५६ खेडी नळयोजना विवादात सापडली आहे. (Disruption of water supply in tap water supply scheme in girna river nashik news)

एरवी अधून मधून जलवाहिन्या वारंवार फुटत असतातच. अशातच उपसा करणाऱ्या व्ही टी पंपचे स्टार्टर जळाले, त्यानंतर आज थेट व्हीटी पंप जळाल्याने तो कधी दुरुस्त होईल याकडे ग्रामीण भागातील जनतेचे लक्ष लागले आहे.

नांदगाव शहरालगत असलेल्या हनुमाननगर भागातील पाणीपुरवठा करण्यासाठी आवर्तन सुरु असताना अचानक जलवाहिनी फुटली. तिच्या दुरुस्तीत तीन दिवस गेले, त्यानंतर पाणीपुरवठा सुरू करण्याची वेळ येताच अचानक स्टार्टर जळाले आणि पाणीपुरवठा लांबणीवर पडला. तो आज सुरू करत असताना धरणावरील उपसा करणारे व्हीटी पंप जळाला. योजना कालबाह्य झाली, जलवाहिन्या जुन्या झाल्या अशा साचेबंद सबबी सांगून योजना सुरु असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात येत असते.

सध्या या योजनेचा उपसा करणाऱ्या तीन व्हीटी पंपांपैकी एक पंप नादुरुस्त असून दोन पंपांपैकी एक पंप जळाल्याने स्टॅण्डबायसाठी कुठलीही पर्यायी व्यवस्था कार्यान्वित नसल्याची झळ पाणीपुरवठ्याला बसून वितरण व्यवस्था विस्कळित बनली आहे. या योजनेला शाश्वत पर्याय म्हणून नव्या सुधारणेसह ७८ खेडी नळयोजनेला चालना मिळाली आहे, त्यामुळे नवी योजना सुरू होत असल्याचे गृहीत धरून सध्या चालू स्थितीतील नळयोजनेकडे कुणाचेच लक्ष नाही.

Repair crews pulling out the burnt VT pump that is pumping over the Girna Dam. In the second photo, water is being wasted from a burst water channel near the railway subway in Nandgaon
Jalyukta Shivar Yojana: दुरुस्तीच्या कामांतून शिवार कसे होणार पाणीदार! 9 कोटींपैकी अडीच कोटींची कामे मंजूर

यंत्रणा नेमके करते काय?

सध्या योजनेच्या देखभाल दुरुस्तीच्या खर्चासाठी जिल्हा परिषदेला वर्षाकाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद आहे, मग या खर्चाचे फलित नेमके काय? कमी अधिक पाण्याच्या दाबामुळे जलवाहिन्यातील सांधे उखडून त्या जलवाहिन्या नादुरुस्त होणे, त्याला गळती लागणे, यात नावीन्य नसले तरी अभियांत्रिकी कौशल्य पणाला लावून त्याची डागडुजी करणे हा एक उपाय असतो, मात्र वारंवार योजनेवरील व्हीटी पंप नादुरुस्त होणे, जलवाहिन्या ठराविक अंतरात फुटणे, त्यातून लाखो लिटर पाणी वाया जाणे, एअरव्हाल्वला खुंट्या ठोकणे, असे एकूण निर्माण होणाऱ्या तांत्रिक दोषांची जबाबदारी कुणाची? सहेतुक होत असलेल्या गळत्या रोखताना त्यावर पोलिस कारवाई करावी असा प्रयत्न व्यवस्था सांभाळणाऱ्या यंत्रणेने कितीदा केला? गळतीच्या परिणामावर मार्ग शोधावे तसे होत नाहीत.

Repair crews pulling out the burnt VT pump that is pumping over the Girna Dam. In the second photo, water is being wasted from a burst water channel near the railway subway in Nandgaon
Nashik News: नियमित कर भरणाऱ्यास 20 रुपये किलोने साखर; ग्रामपंचायतीचा निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com