Nashik News : एकीकडे कांद्याला भाव नाही अन दुसरीकडे चाळीत साठवलेला कांदा खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांची ‘इकडे आड-तिकडे विहीर’ अशी अवस्था झाली आहे.
यामुळे कांद्याच्या भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेले कांदा उत्पादक यांना नाईलाजाने कांदा विक्रीसाठी बाजारात काढावा लागत आहे. (Dissatisfaction among farmers due to onion price Outbreak of agitations price of tomatoes and other vegetables low Nashik News)
त्यात कांद्याला अत्यल्प भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात तीव्र असंतोष असून आंदोलनांचे भडके उडू लागले आहेत. नामपूर, करंजाड, चांदवड, सटाणा, डांगसौंदाणे, देवळा आदी ठिकाणी कांद्याला मिळत असलेल्या कमी भावामुळे रास्तारोको करत आंदोलने होत आहेत.
यामुळे सत्ताधारी सरकारने शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, अन्यथा पुढील काळात मोठे आंदोलन होण्याची शक्यता आहे.
येथील कसमादे भागात मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला जातो. यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा चाळीत साठवला असला तरी तो टिकाऊ नसल्याने तो खराब होऊ लागला आहे. सध्या उन्हाळ कांद्यास सरासरी फक्त पाचशे ते आठशे रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे.
आज ना उद्या भाव वाढेल या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चाळीतील कांदा खराब होऊ लागला आहे. यामुळे नाईलाजाने चाळीतील कांदा बाहेर काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. एकीकडे भाव नाही अन दुसरीकडे चाळीतील कांदा खराब होऊ लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
त्यात अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याने त्याचाही उद्रेक होऊ लागला आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने प्रतिकुल परिस्थिती असताना सरकार मात्र याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. सध्या शेतकऱ्यांच्या कोणत्याच शेतमालाला भाव नाही. टोमॅटोसह इतर भाजीपाला अत्यल्प भावात विकला जात आहे. कोणते पीक घेत उत्पादन घ्यावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा साऱ्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक समीकरणे विस्कळीत झाली आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
कांदा फेकण्याच्या खर्चाची भर
अवकाळी पाऊस व गारपीट मुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा प्रंचड प्रमाणात खराब झाला. तशाही परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अवाच्या सव्वा खर्च करून कांदा काढून चाळीत साठवला. परंतु, एक दीड महिन्यातच चाळीतला कांदा सडू लागला आहे.
असा खराब कांदा तो पावड्याने उचलून फेकण्याची वेळ आली आहे. विठेवाडी शिवारातील धनंजय बोरसे यांनी एप्रिल महिन्यात साठवणूक केलेला कांदा असाच फावडे लावून फेकण्याची वेळ आली आहे.
कांद्याचा पैसा तर झालाच नाही, उलट कांदा बाहेर काढून फेकण्याचा त्यांचा खर्च वाढल्याने ते हताश आहेत.
"उन्हाळ कांदा लागवडीपासून, काढणी साठवणूक यासाठी मोठा खर्च केला. चांगले उत्पादन यंदा निघाले. मात्र सततच्या कोसळत्या बाजारभावाने आर्थिक गणित बिघडवले. साठवलेला कांदा आज सडत चालला आहे. त्यामुळे सरकारने कांद्याला हमीभाव व नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्यांचे दु:ख कमी करावे, अन्यथा मोठे आंदोलन उभे राहील."
- जयदीप भदाणे, जिल्हाध्यक्ष, कांदा उत्पादक शेतकरी संघटना
"कांदा लागवडीसाठीपासून तर चाळीत साठवणूक करेपर्यंत लाखो रुपये खर्च केला. दीड महिन्यातच चाळीतला संपूर्ण कांदा सडल्यामुळे मजुर लावून अक्षरशः उकिरड्यावर फेकण्याची वेळ आली आहे, दुसरीकडे ३० गुंठे टोमॅटोची लागवड केली होती, त्यासाठी ७०-७५ हजार रुपये खर्च करून पदरात काहीच पडले नाही. तो मजुर लावून फेकावा लागला. यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही."
- धनंजय बोरसे, विठेवाडी (ता. देवळा)
"कांद्याला मिळणारा अत्यल्प भाव आणि त्यात चाळीतील खराब होणारा कांदा यामुळे यंदा उत्पादन खर्चही वसूल होणार नाही. शेतकऱ्यांच्या घामाचा तर हिशेबच नाही. कोणत्याच शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱ्याने जगावे कसे हा एक प्रश्न आहे. आजच्या घडीला शेतकरी पूर्णपणे कोलमडला असून, अवकाळी पाऊस व गारपिटीनंतर लाखो रुपये खर्चून पिकवलेला कांदा चाळीत सडतो आहे."
- कुबेर जाधव,
संपर्क प्रमुख, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.