Nashik News : ‘साहेब, लाईट कधी येईल होऽऽ’; अंबासनच्या त्रस्त कांदा उत्पादकांची आर्त हाक

A farmer while giving a statement to the power distribution authorities that a sub-centre should be set up to solve the problem of electricity.
A farmer while giving a statement to the power distribution authorities that a sub-centre should be set up to solve the problem of electricity.esakal
Updated on

अंबासन (जि. नाशिक) : हॅलो, साहेब कांदा लागवड सुरू आहे. लाईट केव्हा येईल? पाण्याअभावी वाफ्यातला लागवड केलेला कांदा होरपळतोय हो... अशी आर्त हाक येथील शेतीशिवारातील शेतकऱ्यांकडून वीज महावितरणला घातली जात आहे. या परिसरात वीजेची समस्या नेहमीचीच असल्याने गावानजीक वीज महावितरण कंपनीकडून उपकेंद्र उभारण्यात यावे यासाठी युवा शेतकऱ्यांनी कार्यालय गाठून नुकतेच वीज वितरणला निवेदन दिले. ( Distressed onion farmers of Ambasan due to no electricity Nashik News)

शेतीशिवारातील कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांसह मजूरवर्ग शेतात दिसून येत आहेत. मात्र वीजेच्या लपंडावामुळे शेतकरी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून त्रस्त आहेत. शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने कांदा पिकांवर परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे. शेतीपंप सुरू केल्यानंतर वाफ्यापर्यंत पाणी पोचत नाही तोच दोन ते तीन वेळा विजपुरवठा खंडीत होत असल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत संबंधित वीज महावितरणच्या कार्यालयात संपर्क केल्यास ओव्हर लोड असल्याचे कारण पुढे केले जात असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले. अंबासन गावासह शेतीशिवाराचा मोठा पसारा येत असून अंबासन फिडरवर कमी दाबाचा वीज पुरवठा, सबस्टेशनचे अंतर जास्तीचे असल्याने तसेच, ओव्हर लोडमुळे आठ तास वीज पुरवठा सुरळीत होत नाही. गावानजीक वीज महावितरण कंपनीचे उपकेंद्र व्हावे यासंदर्भात स्थानिक ग्रामपंचायतीने १७ मेस पत्रव्यवहार केला होता.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

A farmer while giving a statement to the power distribution authorities that a sub-centre should be set up to solve the problem of electricity.
Nandurbar News : आदिवासी जमिनीवरील अतिक्रमण प्रश्‍नी नोटिसा

दरम्यान, वीज महावितरण कंपनीने तातडीने दखल घेऊन उपकेंद्र उभारावे व शेतीशिवारातील वीजेच्या समस्या कायम स्वरूपी निकाली काढाव्यात यासाठी युवा शेतकऱ्यांनी वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयात धडक देऊन निवेदन सादर केले. त्यावर विशाल कोर, चंद्रकांत कोर, बळवंत देवरे, भुषण भामरे, दादाजी कोर, हेमंत देवरे, अॅड. निलेश सावंत आदिंच्या सह्या आहेत.

"शेतात कांदा लागवड सुरू आहे. मात्र वीजेच्या लपंडावामुळे वेळीच पाणी मिळत नसल्याने लागवड केलेला कांदा होरपळत आहे. वीज महावितरणने लक्ष घालावे."

-विशाल कोर, कांदा उत्पादक युवा शेतकरी अंबासन.

"गेल्या अनेक वर्षांपासून वीजेच्या समस्यांबाबत निवेदनं दिली. ओव्हर लोड होत असल्याचे कारण देत वेळ मारून नेत आहेत. अंबासन गावानजीक उपकेंद्र होणे गरजेचे आहे."

-हेमंत देवरे, युवा शेतकरी, अंबासन.

A farmer while giving a statement to the power distribution authorities that a sub-centre should be set up to solve the problem of electricity.
Nashik Crime News : मालेगाव येथे छाप्यात गुंगीचे औषध, गोळ्या जप्त!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.