Gram Sevak Award : 5 वर्षांपासून रखडलेल्या आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे सोमवारी वितरण

Gram Sevak Award
Gram Sevak Awardesakal
Updated on

Gram Sevak Award : गत पाच वर्षांपासून जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागांतर्गत रखडलेल्या पुरस्काराला अखेर मुहूर्त मिळाला आहे.

ग्रामपंचायत विभागातील पाच वर्षातील ७५ तर, सहा विस्तार अधिकारी यांच्या पुरस्काराची घोषणा केली असून सोमवारी (ता.८) पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली. (Distribution of Adarsh ​​Gram Sevak Award which stalled for 5 years on Monday nashik)

ग्रामसेवकांच्या कामांचे मूल्यमापन होऊन गावची विकासाच्या दिशेने वाटचाल व्हावी, याकरिता शासनाने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार योजना आणली. परंतु, गत पाच वर्षांपासून जिल्हा परिषदेने आदर्श ग्रामसेवकांचे वितरण केले नाही.

त्यामुळे दरवर्षी १५ या प्रमाणे पाच वर्षातील ७५ ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पुरस्कारापासून वंचित असल्याचे वृत्त ‘सकाळ’ ने ३ मे रोजी प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर तातडीने ग्रामपंचायत विभागाने पुरस्कार यादी मंजूर करत त्यांचे वितरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

सोमवारी (ता.८) सकाळी १० वाजता कालिदास कलामंदिर येथे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी सर्व विभाग प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Gram Sevak Award
NDCC Bank: वसुलीवर भर, नवीन वैयक्तीक सभासद वाढविण्यावर भर; जिल्हा बॅंक बचाव मेळाव्यात निर्धार

जाहीर झालेले पुरस्कार

सन २०१८ - बापू पवार, रामदास इंगळे, अलका तरवारे, ज्ञानेश्वर जाधव, प्रमिला खंबाईत, रतन बारवरकर, गणेश भोई, साहेबराव देवरे, जयश्री निकम, सीमा समशेर, एकनाथ बोरसे, भगवान जाधव, बाळनाथ बोराडे, दिनकर कुमावत, वनिता वर्पे

सन २०१९ - उत्कर्ष पाटील, संभाजी मारकंडे, मनोहर गांगुर्डे, भारती देशमुख, मनोहर गायवन, बाळासाहेब पाटील, सुवर्णा दळवी, राहुल नांद्रे, पूनम सोनजे, विशाल सोनवणे, दीपाली गोसावी, साहेबराव बोरसे, प्रदिप बोडके, शीतल सनेर व जालिंदर वाडगे.

सन २०२० - ज्ञानेश्वर भोर, गणेश मोढे, किशोर मराठे, प्रवीण सुरसे, राजेंद्र चौधरी, रमेश राख, अनिल न्हायदे, सुवर्णा भामरे, उत्तम खैरनार, आम्रपाली देसाई, बापू भामरे, युवराज निकम, गोपीचंद खैरे, भालचंद्र तरवारे, संदीप देवरे.

सन २०२१- योगेश पगार, सुरेखा चव्हाण, सुवर्णा बोरसे, नंदू गायकवाड, पद्मा देशमुख, अनंत जेट्टे, वैशाली देवरे, अमोल देवरे, अनिल आहेर, प्रतिभा पाटील, रमेश द्यानद्यान, नंदकिशोर अमृतकर, सतीश सोनवणे, संदीप पाटील, माधव यादव.

सन २०२२ - प्रतिभा घुगे, संतोष हाडंगे, संदीप महाजन, मनोज अहिरराव, चंद्रकांत चौधरी, राजश्री सनेर, रामराव महाजन, दिनेश कापडणीस, रूपेश आहेर, पुष्पा भोये, सरला पगार, रवींद्र काकळीज, विशाल करवडे, जंगम ज्योतिलिंग, प्रमोद शिरोळे.

विस्तार अधिकारी - अण्णा किसन गोपाळ, जगन्नाथ सोनवणे, कैलास गादड, श्रीधर सानप, जयवंत भामरे, काशिनाथ गायकवाड.

Gram Sevak Award
Child Marriage : जिल्ह्यात महिनाभरात रोखले 13 बालविवाह; बालविवाह प्रतिबंधक धडक मोहीम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()