Nashik News: जायकवाडीला पाणी सोडण्याबाबत जिल्हा प्रशासन पेचात; न सोडण्याच्या आदेशाची प्रतीक्षा

MLA devyani friends suggest Use dead water reservoir of Jayakwadi nashik news
MLA devyani friends suggest Use dead water reservoir of Jayakwadi nashik news esakal
Updated on

Nashik News : मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे ‘जायकवाडी’ला पाणी सोडण्याच्या मुद्यावरून जिल्हा प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. पाणी सोडण्याचे आदेश प्राप्त होऊनही पाणी का सोडले नाही, याची विचारणा होऊ शकते.

स्थानिक नेत्यांनी मात्र जिल्हा प्रशासनाला पाणी न सोडण्याचे तोंडी आदेश दिले आहेत. त्यामुळे नेमकी काय भूमिका घ्यावी, याविषयी प्रशासनच बुचकळ्यात सापडले आहे. (district administration is confused about releasing water to Jayakwadi nashik news)

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतून साडेआठ टीएमसी पाणी ‘जायकवाडी’ला सोडण्याचे आदेश सोमवारी (ता. ३०) प्राप्त झाले. त्याविषयी प्रशासकीय सोपस्कार पार पाडत प्रशासनाने पाणी सोडण्याची संपूर्ण तयारी केली आहे; पण अगोदरच मराठा आरक्षणामुळे वातावरण गरम आहे.

जिल्ह्यात अभूतपूर्व दुष्काळाची परिस्थिती असल्याने शेतकरी चिंतेत असताना पाणी सोडण्याचा निर्णय घेतला तर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यातून मराठवाडा विरुद्ध नाशिक, अहमदनगर असा संघर्ष उभा राहू शकतो.

MLA devyani friends suggest Use dead water reservoir of Jayakwadi nashik news
YCMOU News : ड्रोनचे प्रशिक्षण, आरोग्‍यसेविकाही घडविणार; मुक्‍त विद्यापीठाचे विविध संस्‍थांबरोबर सामंजस्‍य करार

नाशिकच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी तर थेट उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत नाशिक-अहमदनगरच्या धरणांमधून ‘जायकवाडी’ला पाणी सोडण्याच्या निर्णयावर स्थगिती द्यावी, अशी मागणी केली. अहमदनगर जिल्ह्यातील एका व्यक्तीने पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

त्यामुळे पाणी सोडण्याच्या निर्णयाबाबत प्रशासनातच द्विधा मनस्थितीत आहे. आता या सर्व घडामोडींमध्ये अखेर पाणी सोडले गेलेच नाही. याबाबत जलसंपदा व जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी पाणी सोडण्याची तयारी केली असल्याचे सांगत आम्ही ‘वेट अॅन्ड वॉच’च्या भूमिकेत असल्याचे सांगितले.

MLA devyani friends suggest Use dead water reservoir of Jayakwadi nashik news
Lek Ladki Yojana: राज्यात गोरगरीब मुलींना मिळणार लाख रुपयांची भेट; सक्षमीकरणासाठी लेक लाडकी नवीन योजनेची भर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.